४२ खेड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:58 AM2018-08-12T00:58:44+5:302018-08-12T00:59:15+5:30
नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरणातून राबविण्यात आलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना वीजबिल थकल्याने तब्बल २९ दिवस बंद होती. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर नांदगाव तालुक्यातील २६ व चांदवड तालुक्यातील १६ गावांचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरणातून राबविण्यात आलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना वीजबिल थकल्याने तब्बल २९ दिवस बंद होती. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. १७ लाख ५१ हजार रुपये थकीत बिलापैकी ५ लाख २५ हजार रुपयांचा रोख भरणा केल्यानंतर सदर योजना पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे नांदगावचा पाणीपुरवठा पूर्ववत होऊ शकला आहे. दि. १२ जुलै रोजी योजनेचा वीजपुरवठा थकीत बिलामुळे महावितरण कंपनीकडून बंद करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नांदगावकरांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागला. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर नांदगाव तालुक्यातील २६ व चांदवड तालुक्यातील १६ गावांचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
धरणातून अवैध उपसा
पिण्याच्या पाण्याच्या योजनेची अशी परवड झालेली असताना दुसरीकडे याच धरणाचे पाणी शेती व अन्य कारणासाठी अविरत उपसण्याचे काम पंपाद्वारे सुरू होते. २० अश्वशक्तीचे सुमारे २०० पंप या कामाला जुंपले होते. यामुळे धरणातले पाणी मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा बंद झाल्यानंतरही सुमारे २५ दिवस पंप सुरू होते. पिण्याच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या व त्यांना साहाय्य करणाºया वीज वितरण कंपनी व जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाºयांवर याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.