कांदा अनुदान योजनेच्या वाढीव मुदतीत ४२ हजार क्विंटल कांदा विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 05:58 PM2019-02-08T17:58:39+5:302019-02-08T17:58:53+5:30

सिन्नर : कांदा अनुदान योजनेला ३१ डिबेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या वाढीव मुदतीत सिन्नर बाजार समितीमध्ये ४१ हजार ५५४ क्विंटल कांदा शेतमालाची विक्री झालेली आहे. सदर कांदा विक्री करणाºया शेतकºयांना या योजनाचा लाभ मिळणार आहे.

42,000 quintals of onion sale in the extended period of the onion grant scheme | कांदा अनुदान योजनेच्या वाढीव मुदतीत ४२ हजार क्विंटल कांदा विक्री

कांदा अनुदान योजनेच्या वाढीव मुदतीत ४२ हजार क्विंटल कांदा विक्री

Next

सिन्नर : कांदा अनुदान योजनेला ३१ डिबेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या वाढीव मुदतीत सिन्नर बाजार समितीमध्ये ४१ हजार ५५४ क्विंटल कांदा शेतमालाची विक्री झालेली आहे. सदर कांदा विक्री करणाºया शेतकºयांना या योजनाचा लाभ मिळणार आहे.
कांदा दरातील झालेल्या घसरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यासाठी राज्य शासनाने प्रति क्विंटल २०० रूपये अनुदान जाहीर केले होते. विक्री केलेल्या कांद्याला अनुदान देण्यासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व सचिव विजय विखे यांनी दिली.
१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत बाजार समितीमध्ये विक्र ी केलेल्या कांदा शेतमालास राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे २०० रूपये प्रती क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्याप्रमाणे कृषि उत्पन्न बाजार समिती, सिन्नरने व तालुका स्तरीय समितीने सुमारे २ हजार ४१ शेतकºयांचे ६३ हजार ४१६ क्विटल व १ कोटी २६ लाख ८६ हजार ३४२ रूपयांचे प्रस्ताव नाशिकच्या जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केलेले आहेत. बाजार समितीच्या आवारात कांदा शेतमालाची विक्री केलेल्या सुमारे ७५ टक्के शेतकरी निकष व अटी नुसार या अनुदानाच्या संधीचा लाभ घेण्यास पात्र ठरलेले आहेत.

Web Title: 42,000 quintals of onion sale in the extended period of the onion grant scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा