राज्यातील ४२२ आश्रमशाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:31+5:302021-01-14T04:13:31+5:30
चौकट - नाशिक विभागात अत्यल्प उपस्थिती नाशिक विभागातील २०३ शासकीय आश्रमशाळांपैकी १८२ शाळा सुरू झाल्या असून ३१ शाळा अद्याप ...
चौकट -
नाशिक विभागात अत्यल्प उपस्थिती
नाशिक विभागातील २०३ शासकीय आश्रमशाळांपैकी १८२ शाळा सुरू झाल्या असून ३१ शाळा अद्याप बंद आहेत. या शाळांमध्ये एकूण २४ हजार २४१ इतकी पटसंख्या असून त्यापैकी केवळ ५४७० विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती आहे. तर २११ अनुदानित आश्रमशाळांपैकी १९४ शाळा सुरू झाल्या असून या शाळांमधील २७५७९ पटसंख्येपैकी फक्त ५८५५ विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित आहेत.
चौकट -
प्राथमिकसाठी अनलॉक लर्निंग
१ ते ८ वी पर्यंतच्या आश्रमशाळा अद्याप सुरू झालेल्या नसल्या तरी या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विभागाचा अनलॉक लर्निंग उपक्रम सुरू असून या शाळांमधील शिक्षक व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष गावात जाऊन विद्यार्थ्यांशी संपर्क साधत आहेत. या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.