दिंडोरी तालुक्यातील ४३ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:44 PM2020-07-10T21:44:47+5:302020-07-11T00:17:48+5:30
दिंडोरी : तालुक्यात आतापर्यंत ८४ जण कोरोनाबाधित असून, तीन रुग्णांचा यात बळी गेला आहे. ४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४० जणांवर उपचार सुरू आहेत.
दिंडोरी : तालुक्यात आतापर्यंत ८४ जण कोरोनाबाधित असून, तीन रुग्णांचा यात बळी गेला आहे. ४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४० जणांवर उपचार सुरू आहेत. दिंडोरी तालुक्यात सर्वप्रथम इंदोरे येथे मुंबईहून आलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्यास बाधा झाली होती. त्यानंतर निळवंडी, दिंडोरी, मोहाडी, वणी, परमोरी, ननाशी, दहिवी, वरखेडा, आंबे वणी, अवनखेड, ढकांबे, खेडगाव, जानोरी, आंबे दिंडोरी, तळेगाव दिंडोरी, लखमापूर, बोपेगाव, पिंपळगाव केतकी या गावांतही कोरोनाने शिरकाव केला़ सर्वाधिक रु ग्ण मोहाडी आढळून आले होते. येथील एकाच कुटुंबातील १४ जणांना बाधा झाली होती तर परमोरी येथील एकाच कुटुंबातील ६, दिंडोरी येथे एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोना झाला होता. यातील ४० जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर तिघांचा बळी गेला़.
-------------------
दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या नाशिक मार्केट कनेक्शनमुळे सर्वाधिक रु ग्ण आढळले आहेत. बाजारपेठ सुरू झाल्यामुळे बाजारात गर्दी होत आहे. तालुक्यातील विविध औद्योगिक कंपन्यांचे व्यवस्थापन, कामगार, ठेकेदार यांची बैठक घेत विविध उपाययोजना करत काळजी घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, डॉ. सुजित कोशीर यांनी केले.