‘आरटीई’साठी जिल्ह्यात ४३३ शाळांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:33 AM2018-01-24T00:33:53+5:302018-01-24T00:34:15+5:30
सन २०१८-१९साठी राबविण्यात येणाºया आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळा नोंदणीच्या अखेरच्या दिवसापर्यंत शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने शाळांना २५ तारखेपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशाच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० तारखेपर्यंत शाळांना नोंदणीप्रक्रियेत समाविष्ट होणे अपेक्षित असताना बºयाच शाळांची अद्यापही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे २५ टक्के प्रवेशाची प्रकिया पुढे सरकली आहे.
नाशिक : सन २०१८-१९साठी राबविण्यात येणाºया आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळा नोंदणीच्या अखेरच्या दिवसापर्यंत शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने शाळांना २५ तारखेपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशाच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० तारखेपर्यंत शाळांना नोंदणीप्रक्रियेत समाविष्ट होणे अपेक्षित असताना बºयाच शाळांची अद्यापही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे २५ टक्के प्रवेशाची प्रकिया पुढे सरकली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. अशा प्रक्रियेतून शाळेत दाखल होणाºया विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते. त्यामुळे अशा शाळांना या प्रक्रियेत आपल्या शाळेतील २५ टक्के प्रवेश राखून ठेवण्याबाबतची नोंदणी आॅनलाइन करणे अपेक्षित आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार शाळेंना २० तारखेपर्यंत नोंदणी करून सहमती दाखविणे अनिवार्य होते. परंतु काही शाळांकडून विलंब झाल्याने तसेच काही शाळांकडून कागदपत्रांची पूर्तता होऊ न शकल्याने त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. संबंध राज्यात अशाप्रकारे असंख्य शाळांचे अजूनही नोंदणी बाकी आहे. या शाळांना नोंदणीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून २५ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राहिलेल्या शाळा या २५ तारखेपर्यंत शाळांचा सहभाग नोंदविणार आहेत. नाशिक जिल्ह्यातही शाळा नोंदणीला गती आली आहे. परंतु काही त्रुटींमुळे अनेक शाळांची अद्याप नोंदणी होऊ शकलेली नाही. आत्तापर्यंत सुमारे ४३३ शाळांनी आरटीईसाठी नावनोंदणी केली आहे. मागीलवर्षी ५३७ इतक्या शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केलेली होती. यंदा यातील काही शाळा अनुदानित झाल्याने शाळांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
प्रवेशाच्या तारखेत बदल शक्य
आरटीई प्रवेशाबाबतच्या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार शाळांनी १० ते २० जानेवारी या कालावधीत नोंदणी करणे अपेक्षित होते, तर २२ रोजी शाळांची पडताळणी केली जाणार होती, तर पालक २४ पासून आॅनलाइन प्रवेशासाठी अर्ज करू शकणार होते. परंतु आता शाळांना मुदतवाढ देण्यात आल्यामुळे आॅनलाइन प्रवेशाच्या तारखेतही बदल होणार आहे.