कादवा निवडणुकीसाठी ४४ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 01:23 AM2022-03-03T01:23:00+5:302022-03-03T01:23:18+5:30
जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी २१३ अर्जांची विक्री झाली असून २७ उमेदवारांचे ४४ अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (दि. ४) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून अखेरच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत.
दिंडोरी : जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी २१३ अर्जांची विक्री झाली असून २७ उमेदवारांचे ४४ अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (दि. ४) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून अखेरच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे यांच्यासह सत्ताधारी गटाच्या बहुतांशी संचालकांनी अर्ज दाखल केले असून गुरुवारी विरोधी गटातर्फे अर्ज दाखल केले जाणार आहेत.
बुधवारी अमावस्या असल्याने पाचच अर्ज दाखल झाले. सत्ताधारी गटाला शह देण्यासाठी विरोधी गटाने पॅनल करण्याची तयारी केली असून शिवसेनेने मोहाडी येथे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी,ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेत पॅनल उभे करण्याची तयारी केली आहे. गुरुवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी अर्ज दाखल केला आहे.
इन्फो...
यांनी दाखल केले अर्ज
मातेरेवाडी गटात श्रीराम शेटे,मधुकर गटकळ, त्रंबक संधान,शिवानंद संधान,संजय पाटील, दिंडोरी गटात बाळकृष्ण जाधव, दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, अजित खांदवे, कसबे वणी गटात विश्वनाथ देशमुख, संपत कोंड, विजय वाघ, वडनेर भैरव गटात शिवाजीराव बस्ते, भास्करराव दवंगे, चांदवड गटात सुभाष शिंदे, सुखदेव जाधव, महिला राखीव गटात शांताबाई पिंगळ,उज्ज्वला पिंगळ,चंद्रकला घडवजे, इतर मागास वर्ग गटात मधुकर गटकळ, प्रकाश पिंगळ, त्र्यंबक संधान, गोरक्षनाथ पुरकर, शिवानंद संधान, भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग गटात सुनील केदार, सुक्रमदास बैरागी, शशिकांत गामने, अनुसूचित जाती जमाती गटात गोकूळ झिरवाळ, राजेंद्र गांगुर्डे, जयवंत भालेराव, सोसायटी गटात श्रीराम शेटे, भास्करराव पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत.