जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के साठा

By admin | Published: March 5, 2017 02:19 AM2017-03-05T02:19:34+5:302017-03-05T02:22:14+5:30

नाशिक : जिल्ह्यात पाण्याची मागणी व धरणामधील उपलब्ध साठा पाहता आगामी चार महिन्यांत पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

44 percent of the reservoirs in the dams in the district | जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के साठा

जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के साठा

Next

 नाशिक : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागताच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, पाण्याची मागणी व धरणामधील उपलब्ध साठा पाहता आगामी चार महिन्यांत पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के साठा असून, त्यात सिंचनाचे आवर्तनासाठी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात सात वर्षांनंतर गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणांमध्येही आॅक्टोबर अखेर ९२ टक्के इतका साठा शिल्लक होता. याशिवाय समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले, तसेच गावोगावी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील पाझरतलाव, सीमेंट बंधारे, शेततळ्यांमध्येही कमालीचे पाणी साठले. या साठलेल्या पाण्यातून शेतकऱ्यांनी खरीप व रब्बीचे पिके पिकविली. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी शक्यता व्यक्ती केली जात असताना, प्रत्यक्षात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा तडाखा बसू लागल्याने पाण्याचे (पान ७ वर)



नैसर्गिक स्त्रोत आटू लागले, विहिरींनीही तळ गाठल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. विशेष करून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यास सुरुवात झाली आहे.
सध्या जिल्ह्णातील मोठे, मध्यम धरणांमध्ये ४४ टक्के इतकेच पाणी शिल्लक असून, या पाण्यावर आगामी चार महिन्यांची गरज भागवावी लागणार आहे. त्यातही नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ५८ टक्के इतके पाणी शिल्लक आहे. याशिवाय पालखेड धरण समूहात १७ तर गिरणा खोऱ्यात ४४ टक्के साठा आहे. या शिल्लक पाणी साठ्यात जिल्ह्णातील पाणीपुरवठा योजना, नळ पाणी योजना तसेच सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या धरणातून त्यासाठी पाणी सोडण्यात येणार असून, याशिवाय लगतच्या जिल्ह्णांचे असलेले आरक्षण वेगळे आहे.

Web Title: 44 percent of the reservoirs in the dams in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.