जिल्ह्यातील ४४० रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 01:22 AM2020-12-17T01:22:52+5:302020-12-17T01:25:38+5:30
दीड महिन्यापासून सातत्याने एकेरी आकड्यात असलेली कोरोना मृत्युसंख्या बुधवारी (दि. १६) दुहेरी आकड्यात पोहोचली. बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला. यात नाशिक मनपा क्षेत्रातील ७, तर नाशिक ग्रामीणमधील ४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंतची एकूण मृत्युसंख्या १८८६ वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यात मंगळवार रुग्णसंख्येत ४०७ रुग्णांची भर पडली असून, ४४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
नाशिक : दीड महिन्यापासून सातत्याने एकेरी आकड्यात असलेली कोरोना मृत्युसंख्या बुधवारी (दि. १६) दुहेरी आकड्यात पोहोचली. बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला. यात नाशिक मनपा क्षेत्रातील ७, तर नाशिक ग्रामीणमधील ४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंतची एकूण मृत्युसंख्या १८८६ वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यात मंगळवार रुग्णसंख्येत ४०७ रुग्णांची भर पडली असून, ४४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या वाढत असतानाच बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी भर पडली. अर्थात नवीन ४०७ रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या ४४० रुग्णांची संख्या अधिक असणे हाच एक दिलासा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६ हजार १६० वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ९१८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३३५६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.०६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.४८, नाशिक ग्रामीणला ९४.४२, मालेगाव शहरात ९३.१३, तर जिल्हाबाह्य ९४.२७ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,३५६ बाधित रुग्णांमध्ये २२०६ रुग्ण नाशिक शहरात, १००५ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १३५ रुग्ण मालेगावमध्ये, तर १० रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख ७ हजार ६४ असून, त्यातील तीन लाख ७० रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ६१६० रुग्ण बाधित आढळून आले असून, ८३४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.