प्रत्येक प्रभागाला ४५ सफाई कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 02:46 PM2017-09-29T14:46:00+5:302017-09-29T14:46:05+5:30
नाशिक : महापालिकेतील सफाई कर्मचाºयांच्या सोयीच्या नियुक्त्या आणि प्रभागांमध्ये सफाई कर्मचाºयांचे असमतोल वाटप याबाबत सभागृहात सदस्यांकडून वारंवार होणारी ओरड लक्षात घेता महापौरांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने सफाई कर्मचाºयांचे समान वाटपाचे सूत्र तयार केले असून ३१ प्रभागांना प्रत्येकी ४५ सफाई कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. आठवडाभरात त्याबाबतची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मागील महिन्यात झालेल्या महासभेत हेमलता कांडेकर यांनी शहरातील सफाई कर्मचाºयांसंबंधी माहिती विचारलेली होती. त्यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत सफाई कर्मचाºयांच्या असमतोल नियोजनाचे वास्तव समोर आले होते. महापालिकेत सफाई कर्मचाºयांची संख्या १९९३ असली तरी त्यातील २६२ कर्मचारी हे प्रशासनाच्या कामाच्या सोयीने प्रत्यक्ष रस्त्यावर काम न करता विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वाधिक १८८ कर्मचारी कार्यरत आहेत तर सर्वात कमी अवघे ६ कर्मचारी प्रभाग २८ मध्ये कार्यरत आहेत. जुन्या नाशिकमधीलच प्रभाग क्रमांक १४ मध्ये १४३ कर्मचारी नियुक्त आहेत. दोन्ही प्रभागात दाट लोकवस्ती असली तरी कर्मचाºयांची संख्या ३३१ इतकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संख्या असली तरी जुने नाशिक परिसरात स्वच्छतेबाबतची ओरड काही थांबलेली नाही. अनेक प्रभागांमध्ये २० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय, अनेक कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर नसल्याचे अधिकाºयांनी दिलेल्या भेटीत निदर्शनास आले होते. त्यामुळे नवीन प्रभाग झाल्याने सफाई कर्मचाºयांचे प्रभागनिहाय समान वाटप करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. महापौरांनीही त्याबाबतचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार, प्रत्येक प्रभागाला ४५ सफाई कामगार उपलब्ध होणार असून अन्य विभागात कामाच्या सोईने नियुक्त झालेल्या २६२ कर्मचाºयांच्या हाती झाडू सोपविण्यात येणार आहे.