४५ लाखांना घातला गंडा; दाम्पत्य गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:13 AM2021-01-15T04:13:36+5:302021-01-15T04:13:36+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील गणेश व्यायाम शाळेमधील काम कृपा अपार्टमेंट मध्ये जानेवारी २०१९ मध्ये संशयित दिनेशकुमार रामाधर ...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील गणेश व्यायाम शाळेमधील काम कृपा अपार्टमेंट मध्ये जानेवारी २०१९ मध्ये संशयित दिनेशकुमार रामाधर मिश्रा (वय ४५) हा त्याची पत्नी माधुरी व मुलांसह राहण्यास आला होता. प्रारंभी त्याने परिसरातील नागरिक व सराफ व्यावसायिक यांच्याशी ओळख वाढवून छोटे-मोठे पैशाचे देण्याघेण्याचे व्यवहार सुरू केले. घेतलेले पैसे वेळेत देऊन लोकांचा विश्वास संपादन केला.
जेलरोड दुर्गादेवी मंदिराजवळ राहणारे अख्तर मुजिद मोंडल यांच्याशी ओळख वाढवून सोने घडविण्याचे मोठे काम देतो असे आमिष दाखवून ४३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख पाच लाख रुपयेदेखील घेतले. तसेच आशीर्वाद बसथांब्याजवळील अष्टेकर ज्वेलर्स येथूनदेखील ११८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने उधारीवर घेऊन पैसे नंतर देतो असे सांगितले. जून २०१९ मध्ये मिश्रा याने कोणालाही काही एक न सांगता बँकेचे व सर्व मोबाईल बंद करून घराला कुलूप लावून निघून गेला. सराफ व्यावसायिक व नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मिश्रा विरुद्ध ४५ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पती-पत्नींला उपनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून उत्तर प्रदेशमधील मथुरा येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे २८ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
--इन्फो--
मुलांच्या शाळा प्रवेशाने दाखविला ‘मार्ग’
सराफ व्यावसायिकांसह सुशिक्षित बेरोजगारांची आर्थिक फसवणूक केल्यानंतर मिश्राने गुजरातच्या एका खासगी शाळेत मुलांचे प्रवेश घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अहमदाबाद गाठले असता तेथे मिश्रा मिळून आला नाही. मिश्रा हा गुजरातमधून उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे असल्याची गोपनीय माहिती तेथून मिळाली. मिश्राच्या नवीन मोबाईल क्रमांकावरून सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी तांत्रिक विश्लेषण करून मिश्राचा ठावठिकाणा शोधला.
---इन्फो---
१५ लाखांचे दागिने अन् आठ लाखांची रोकड हस्तगत
मिश्रा दाम्प्त्याकडून १५ लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख ८ लाख ४० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. तसेच मिश्रााच्या बँक खात्यावर असलेले ४ लाख ५० हजार रुपये गोठविण्यात आले आहे. मिश्रा याच्याकडून पोलिसांनी २७ लाख ९० हजार रुपयाांचा ऐवज जप्त करण्यात यश मिळविले आहे. संशयित मिश्रा पती-पत्नींना गुरुवारी दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता संशयित माधुरी हिला न्यायालयीन कोठडी देत मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर संशयित दिनेेशकुमार याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-----------
छायाचित्र आर फोटोवर १४ उपनगर नावाने...