नाशिकच्या ग्रामदेवता कालिकामाता यात्रोत्सवात वनविभागाकडून ४५० गलोल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 02:19 PM2017-09-27T14:19:40+5:302017-09-27T15:33:06+5:30

कर्मचाºयांचे पथक तयार करुन यात्रेमध्ये गलोव्रिकी करणाºया दुकानांवर धाडी टाकून गलोल जप्त करण्याची मोहिम राबविली. एकूण ४५० गलोल यावेळी जप्त करण्यात आले.

 450 grams seized by forest department in Gramdev Kala Nikamata Yatra of Nashik | नाशिकच्या ग्रामदेवता कालिकामाता यात्रोत्सवात वनविभागाकडून ४५० गलोल जप्त

नाशिकच्या ग्रामदेवता कालिकामाता यात्रोत्सवात वनविभागाकडून ४५० गलोल जप्त

Next

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून नाशिकमधील मुंबई नाका परिसरात असलेल्या ग्रामदेवता कालिकामातेचा यात्रोत्सव उत्साहात सुरू आहे. भाविकांची यात्रेत गर्दी होत असून विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. यामध्ये गलोलविक्रीदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाला प्राप्त झाली. यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी तत्काळ वन कर्मचाºयांचे पथक तयार करुन यात्रेमध्ये गलोरव्रिकी करणाºया दुकानांवर धाडी टाकून गलोल जप्त क रण्याची मोहिम राबविली.

एकूण ४५० गलोर यावेळी जप्त करण्यात आले. दरम्यान, गलोलचा उपयोग तरुणांकडून पक्ष्यांवर निशाना साधण्यासाठी होतो तसेच लहान मुलांच्या मनावरही लहानवयात निसर्गाविषयीचे वेगळे संस्कार या खेळणीवजा हत्याराच्या माध्यमातून होण्याची शक्यता असते. निसर्गाचा खरा दागिना असलेल्या पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी यात्रोत्सवात गलोरविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील काही विक्रेत्यांकडून गलोल विक्री सुरू होती, त्यामुळे कारवाई करून गलोल  जप्त करण्यात आले. तसेच सदर विक्रेत्यांना समजही देण्यात आल्याचे खैरनार यांनी सांगितले.

Web Title:  450 grams seized by forest department in Gramdev Kala Nikamata Yatra of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.