सापगावच्या तरूणाकडील ४६ हजारांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:50 PM2018-06-23T14:50:15+5:302018-06-23T14:50:49+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील स्टेट बँकेत सव्वा अकरा वाजता येथील भरणा करणा-यास आलेल्या सापगाव येथील युवकाची ४५ हजारांची रोकड व १६ हजारांचा मोबाईलची लूट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
त्र्यंबकेश्वर : येथील स्टेट बँकेत सव्वा अकरा वाजता येथील भरणा करणा-यास आलेल्या सापगाव येथील युवकाची ४५ हजारांची रोकड व १६ हजारांचा मोबाईलची लूट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तालुक्यातील सापगाव येथील भिमा भास्कर दिवे हा इलेक्ट्रॉनिक दुकानाचा भरणा करण्याकरिता ४५ हजार रूपये घेउन आला होता. यावेळी दोघे अज्ञात भामटे भिमा जवळ आले आणि म्हणाले आमचा देखील दोन लाखाचा भरणा करायचा आहे. आमची स्लीप भरु न देता का ? यावरच न थांबता नव्या रु मालात ठेवलेले नोटांचे पुडके भिमाला दाखविले. भिमा रांगेत उभा होता. त्याबरोबरच त्या दोन किंवा तीन भामट्यानी भिमाकडील ४५ हजार रु पये व मोबाईल मागून घेतला. दोन लाख ज्या पुडक्यात होते. ते पुडके भिमाच्या हातात त्यांनी बँकेत दिले होते. आणि ते भामटे जव्हार फाटा येथील बंद असलेल्या स्टँडकडे चालते झाले. भिमाने हातातील नोटांचे पुडके समाधानाने पाहिले पण त्यात रु मालात नव्या नोटबुकातील नोटांच्या आकाराची पाने कापुन ते रु मालात गुंडाळले होते. भिमा तातडीने बस स्टँडकडे गेला. पण ते पसार झाले होते. दरम्यान पोलीस निरीक्षक रविकांत सोनवने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळासह सर्वत्र शोध घेतला मात्र कोणीही आढळले नाही.दरम्यान स्टेट बँकेचे सी सी टी व्ही फुटेज तपासून या भामट्यांचा शोध तपास सुरू आहे.
---------------
गर्दीचा भामट्यांनी घेतला फायदा
स्टेट बँक आॅफ इंडिया त्र्यंबकेश्वर शाखेत नेहमीच गर्दी होत असते. येथे तासनतास भरणा करणे पैसे काढणे यासाठी वेळ लागत असतो. कर्मचारी कमी आहेत हे कारण नेहमीच पुढे करण्यात येत असते. याचाच फायदा या सराईत भामट्यांनी घेतला असावा. स्वत: जवळचे कागदाचे तुकडे लाखो रु पये आहेत असे भासवत समोरच्या व्यक्ती कडे देऊन विश्वास मिळवायचा आण िनंतर अलगद डाव साधत पोबारा करायचा ही गुन्हेगाराची पध्दत येथे वापरली आहे. यामध्ये बँकेत संथ गतीने व्यवहार होतात तेव्हा हे भामटे सावज हेरण्यात यशस्वी झाले असावेत.