४७ शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 10:50 PM2018-07-03T22:50:52+5:302018-07-03T22:53:20+5:30
नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माचीपाडा येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ४७ झाली आहे.
नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माचीपाडा येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ४७ झाली आहे.
राज्य सरकारने वर्षभरापूर्वी कर्जबाजारी शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करून त्यापुढील कर्जदार शेतकºयांसाठीही योजना जाहीर केली आहे. शासनाच्या या योजनेला सप्टेंबर २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असून, शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सरकारला अपेक्षित असून, त्यातून शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. प्रत्यक्षात गेल्या वर्षी देण्यात आलेल्या या कर्जमाफीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या मात्र कायम राहिल्या आहेत. चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात दरमहा सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सोमवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैरायपाली गावापैकी माचीपाडा येथील बुधा राजाराम सापटे (५५) या शेतकºयाने आत्महत्या केली
आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, शेतकºयांचा पीक पेरणीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. यंदा मान्सून समाधानकारक बसरण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला असल्यामुळे शेतकरी या हंगामाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा बाळगली जात असताना प्रत्यक्षात अजूनही शेतकºयांमध्ये नैराश्य कायम असल्याचे शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटनांतून स्पष्ट झाले आहे.