सिव्हिलमध्ये ४७ टक्के बालके खासगी रुग्णालयातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:55 PM2017-09-08T23:55:16+5:302017-09-09T00:08:05+5:30

नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणत: ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील असून, नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते व त्यातील ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात, त्यामुळे त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

47 percent of the children in the private hospital | सिव्हिलमध्ये ४७ टक्के बालके खासगी रुग्णालयातील

सिव्हिलमध्ये ४७ टक्के बालके खासगी रुग्णालयातील

Next

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणत: ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील असून, नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते व त्यातील ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात, त्यामुळे त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.
राज्यातील बालमृत्यू, अर्भक मृत्यू, उपजत मृत्यू यांचे प्रमाण आटोक्यात असले तरी, यात आणखी घट कशी होईल याकडे आरोग्य खाते लक्ष ठेवून असल्याची माहितीही डॉ. सावंत यांनी दिली. एनआयसीयूमध्ये अर्भकांची विशेष काळजी कशी घेतली जाईल, जंतू संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे तसेच उपजत मृत्यू कसे कमी होतील, याबाबत निओनॅटॅलॉजिस्ट तज्ज्ञांचा समावेश असलेल्या डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात येत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. राज्यातील कार्यरत ३६ एनआयसीयूमध्ये जव्हार, गडचिरोली व नाशिक यांचादेखील समावेश आहे. यात ६०० ते १००० ग्रॅम वजनापर्यंतच्या गुंतागुंतीच्या आजाराने त्रस्त असलेल्या बालकांना बरे करण्यात शासकीय रुग्णालयांना यश प्राप्त झाले आहे. तथापि, यामध्ये अकाली जन्मलेली, कमी वजनाची बालके, रोगशक्ती प्रतिबंध कमी असल्यामुळे अशा अर्भकांना पटकन जंतू संसर्ग होतो. अनेकदा खासगी रुग्णालयातून अशा प्रकारची ‘क्रिटिकल इल’ बालके शेवटच्या क्षणी संदर्भित केली जातात व त्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होते, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. नाशिक जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बालकांची संख्या ८६५ म्हणजे ५६ टक्के इतकी आहे. विशेष नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते. त्यातील ३० टक्के बालके ही एक किलो वजनाची असतात, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. बºयाचदा गर्भामध्ये अर्भकाकडून मिकोनियम स्त्राव गिळल्यामुुळे आणि तो फुप्फुसात गेल्याने त्याला फुप्फुसाचा संसर्ग होतो त्यामुळे अशा बालकांची श्वसनक्षमता आणि हृदय क्षमता ही बेताचीच असते. बाहेरून संदर्भित केलेल्या अर्भकांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

Web Title: 47 percent of the children in the private hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.