४७ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

By Admin | Published: April 12, 2017 11:49 PM2017-04-12T23:49:05+5:302017-04-12T23:49:36+5:30

४७ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

47 sanctioning of water supply schemes | ४७ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

४७ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

googlenewsNext

गणेश धुरी : नाशिक
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद स्तरावरून मान्यता मिळालेल्या राज्यातील ४७ पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन त्यासाठी ३० टक्के निधीही तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्णातील नऊ पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी ३० टक्के निधी अर्थात २ कोटी ३७ लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ४७ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात लातूर जिल्ह्णातील पाच योजनांचा समावेश आहे. सावरगाव थोट नळ पाणीपुरवठा योजना, भंडारवाडी नळ पाणीपुरवठा योजना, येनकी नळ पाणीपुरवठा योजना व मन्नाथपूर-पोलापूर नळ पाणीपुरवठा योजना, वाशिम जिल्ह्णातील एक्कांबा नळ पाणीपुरवठा योजना, गोंदिया जिल्ह्णातील दवडीपार नळ पाणीपुरवठा योजना, लोधीटाला नळ पाणीपुरवठा योजना, शहारवाणी नळ पाणीपुरवठा, घाटबोरी तेली नळ पाणी पुरवठा, कोहळीटोला नळ पाणी पुरवठा, गिरोेला नळ पाणीपुरवठा योजना, सावली नळ पाणीपुरवठा योजना, तसेच गडचिरोली जिल्ह्णातील खैरलांजी नळ पाणीपुरवठा, रांगी नळ पाणीपुरवठा, सावरगाव नळ पाणीपुरवठा, येरकड नळ पाणीपुरवठा योजना, सातारा जिल्ह्णातील गोजेगाव नळ पाणीपुरवठा योजना, परभणी जिल्ह्णातील पिंपळदरी नळ पाणीपुरवठा योजना, वरणा नळ पाणी पुरवठा योजना, इलेगाव नळ पाणीपुरवठा, शिंदेटाकळी नळ पाणीपुरवठा योजना, नंदुरबार जिल्ह्णातील चाकळे नळ पाणीपुरवठा योजना, रनाळे नळ पाणीपुरवठा योजना, भाबलपुर नळ पाणीपुरवठा योजना, विसरवाडी नळ पाणीपुरवठा योजना, चिंचपाडा नळ पाणीपुरवठा योजना, धुळे जिल्ह्णातील मोरदडतांडा नळ पाणीपुरवठा योजना, अजनाड नळ पाणीपुरवठा योजना, कर्ले नळ पाणी पुरवठा योजना, नवलनगर नळ पाणीपुरवठा योजना, छावडी नळ पाणीपुरवठा योजना, आयणे नळ पाणीपुरवठा योजना, निझामपूर नळ पाणीपुरवठा योजना तसेच बुलढाणा जिल्ह्णातील देवखेड नळ पाणी पुरवठा योजना तसेच अमरावती जिल्ह्णातील खेलतापमाळी नळ पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांसाठी ३० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 47 sanctioning of water supply schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.