जिल्ह्यात ४७६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:40+5:302021-01-02T04:12:40+5:30
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३१) एकूण २६६ रुग्णांना नव्याने कोरोना झाला असून तब्बल ४७६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी ...
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३१) एकूण २६६ रुग्णांना नव्याने कोरोना झाला असून तब्बल ४७६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान बुधवारी मनपा आणि ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी २ याप्रमाणे ४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या १९६८ पर्यंत पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ११९ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ६ हजार ४७८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर १९६८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.२३, नाशिक ग्रामीण ९६.१०, मालेगाव शहरात ९३.०९, तर जिल्हाबाह्य ९३.६४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १९६८ बाधित रुग्णांमध्ये ९७५ रुग्ण नाशिक शहरात, ७६९ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १७५ रुग्ण मालेगावमध्ये, तर ४९ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख ३६ हजार ७७६ असून, त्यातील ३ लाख २२ हजार १०३ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १० हजार ११९ रुग्ण बाधित आढळून आले असून,४५५४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.