जिल्ह्यात ४७७६ अंगणवाडी सेविकांची भरती होणार
By admin | Published: August 19, 2014 11:20 PM2014-08-19T23:20:19+5:302014-08-20T00:43:38+5:30
जिल्ह्यात ४७७६ अंगणवाडी सेविकांची भरती होणार
नाशिक : जिल्ह्यातील २६ बालविकास प्रकल्पांतील ४७७६ अंगणवाडी केंद्रांत प्रत्येकी एक याप्रमाणे अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती सुनीता अहेर यांनी दिली.
० ते ६ वयोगटातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या बळकटीकरण धोरणांतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्णातील ४७७६ महिलांना नोकरीची संधी आहे. ही भरती करताना कोणतीही निवड समिती नसून केवळ गुणवत्तेनुसार ही निवडप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे २१ ते ३० वयोगटातील स्थानिक दहावी उत्तीर्ण महिलांना ही सुर्वणसंधी असून, प्रकल्पाचे ब् अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्याचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहनही सुनीता अहेर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)