बागलाण तालुक्यात ४८ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 11:21 PM2020-09-06T23:21:10+5:302020-09-07T00:30:55+5:30
सटाणा : बागलाण तालुका आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालल्याने नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. एकाच दिवसात ४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, सर्वाधिक १६ रुग्ण सटाणा शहरातील आहेत.
सटाणा : बागलाण तालुका आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालल्याने नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. एकाच दिवसात ४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, सर्वाधिक १६ रुग्ण सटाणा शहरातील आहेत.
रविवारी (दि.६) सकाळी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पाचशेहून अधिक कोरोनाबाधित आढळले तर १७ जणांचा बळी गेला आहे. अहवालात सटाणा शहरातील आंबेडकरनगर, माधवनगर, आरकेनगर, भाक्षी रोड या भागात सोळा बाधित सापडले आहेत. त्यामध्ये दोन दहा वर्षीय बालके आणि सहा महिलांचा समवेश आहे. तिळवण, देवळाणे, शेमळी येथेही कोरोनाने शिरकाव केला आहे. देवळाणे येथे दोन, उर्वरित गावात प्रत्येकी एक बाधित सापडला आहे. चांदवडमध्ये दोन दिवसात ३७ बाधितचांदवड तालुक्यात रविवारी (दि. ६) आलेल्या अहवालात शुक्रवारी (दि. ४) घेण्यात आलेल्या जुन्या ४५ पैकी १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी घेण्यात आलेल्या अहवालात ५८ पैकी २२ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. त्यात ४९ वर्षीय पुरुष, दुगाव,
४५ वर्षीय महिला, दुगाव, ४५ वर्षीय पुरुष, दुगाव, ४० वर्षीय महिला, दुगाव, १८ वर्षीय मुलगी, दुगाव, ६५ वर्षीय पुरुष, दुगाव, ६० वर्षीय महिला, दुगाव, ५१ वर्षीय पुरुष, दुगाव, २० वर्षीय तरुण, दुगाव, ४२ वर्षीय पुरुष, काजीसांगवी, ३७ वर्षीय महिला, काजीसांगवी, २९ वर्षींय पुरुष, काजीसांगवी, २४ वर्षीय पुरुष, दिघवद, ६५ वर्षीय महिला, चंद्रेश्वर कॉलनी, चांदवड, ६० वर्षीय पुरुष, पाटे असे आहेत.
दि. ५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या अहवालात २७ वर्षीय महिला, खडकजांब, ३३ वर्षीय पुरुष, खडकजांब, १२ वर्षीय तरुण, १७ वर्षीय तरुणी, ६८ वर्षीय महिला, १५ वर्षीय तरुणी, ५५ वर्षीय पुरुष, शेळके वाडा, चांदवड तर २८ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय पुरुष, नागधोंडी मळा, वडाळीभोई, ८१ वर्षीय पुरुष, उसवाड, ६२ वर्षीय पुरुष, वरचेगाव, चांदवड, ३७ वर्षीय पुरुष, मालसाणे, ३५ वर्षीय व ३० वर्षीय महिला, भरवीर, ३३ वर्षींय पुरुष, राहुड, १२ वर्षीय तरुण, भरवीर,२० वर्षीय तरुण जोपूळ, ८० वर्षीय पुरुष, सुतारखेडे, ३९ वर्षीय पुरुष, सुतारखेडे, २५ वर्षीय पुरुष, धोंडगव्हाण, १७ वर्षीय पुरुष, राहुड, १६ वर्षीय पुरुष, राहुड असे २२ अहवाल व एकूण ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.