सिनेटसाठी जिल्ह्यात ४८ टक्के मतदान; २७ रोजी मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:53 PM2017-11-19T23:53:46+5:302017-11-19T23:55:04+5:30

पुणे विद्यापीठ : ४ हजार ७२५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी रविवारी (दि. १९) नाशिक जिल्ह्यातील १७ केंद्रांतील २५ बुथवर मतदानाची प्रक्रि या सुरळित पार पडली असून, जिल्हाभरातून ४८.१५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८१३ मतदारांपैकी ४ हजार ७२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, या निवडणुकीची मतमोजणी २७ नोव्हेंबरला होणार आहे.

48 percent voting in the district; Counting on 27th | सिनेटसाठी जिल्ह्यात ४८ टक्के मतदान; २७ रोजी मतमोजणी

सिनेटसाठी जिल्ह्यात ४८ टक्के मतदान; २७ रोजी मतमोजणी

Next
ठळक मुद्देसिनेटसाठी जिल्ह्यात ४८ टक्के मतदान; २७ रोजी मतमोजणी पुणे विद्यापीठ : ४ हजार ७२५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी रविवारी (दि. १९) नाशिक जिल्ह्यातील १७ केंद्रांतील २५ बुथवर मतदानाची प्रक्रि या सुरळित पार पडली असून, जिल्हाभरातून ४८.१५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८१३ मतदारांपैकी ४ हजार ७२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, या निवडणुकीची मतमोजणी २७ नोव्हेंबरला होणार आहे.
सिनेटसाठी नाशिकमध्ये एकूण ४०.१५ टक्के मतदान झाले असून, येवला तालुक्यात सर्वाधिक७३ टक्के मतदान झाले, तर सर्वांत कमी ३६ टक्के मतदान शहरातील एचपीटी महाविद्यालयातील केंद्रावर झाले. सिनेट निवडणुकीत यंदा तिरंगी लढत होत असून, नाशिक जिल्ह्यातून तिन्ही पॅनलमधील सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, २७ नोव्हेंबर रोजी विद्यापीठात मतमोजणी होणार आहे. पुणे विद्यापीठातर्फेनाशिकसह नगर व पुणे जिल्ह्यांत सिनेटच्या पदवीधर आणि व्यवस्थापन विभागासाठी शहरातील सहा केंद्रांवर तर जिल्ह्यातील ११ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रांवर सकाळी १० वाजेपासून मतदारांचा उत्साह दिसून अला. दुपारच्या सुमारास मतदारांचा ओघ काही प्रमाणात ओसरल्याचे पाहायला मिळाले असले तरी संध्याकाळी अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानाची आकडेवारी ४८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. शहरातील के. के. वाघ महाविद्यालय, व्ही. एन. नाईक महाविद्यालय, भोसला महाविद्यालय, एचपीटी महाविद्यालय, सिडको महाविद्यालय आणि नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ५० हजार मतदारांनी नोंदणी केली होती. त्यातील नाशिकमध्ये ९ हजार ८१३ पैकी ४ हजार ७२५ मतदारांनी सहा मतदारांचे नशीब मतपेटीत बंद केले असून, या निवडणुकीचा कौल २७ नोव्हेबरला मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे. केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारीव्ही. एन. नाईक महाविद्यालय ४४ टक्के मतदान झाले असून, एचपीटी महाविद्यालयातील केंद्रावर ३६ टक्के मतदान झाले. सिडको महाविद्यालयात ४४ टक्के, के. के. वाघ महाविद्यालयात ४० टक्के, नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ३८.७, भोसला महाविद्यायात ४५, मनमाड येथील केंद्रात ६४, इगतपुरीत ६९, मालेगावी ४६, देवळ्यात ६७.२५ कळवणमध्ये ७०.१८, येवल्यात १३, सटाणा येथे ६४, दिंडोरीत ६८, सिन्नरमध्ये ६१, चांदवडला ४७, तर पिंपळगाव येथे ५५ टक्के मतदान झाले.

Web Title: 48 percent voting in the district; Counting on 27th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.