नायलॉन मांजाचे ४८ रिळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:14 PM2020-12-31T23:14:20+5:302021-01-01T00:31:13+5:30

नाशिक : मानवी जीवितासह पक्ष्यांच्याही जीवितासाठी धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर, विक्री व साठवणुकीवर जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे. परिमंडळ-२ मधील सातपूर, नाशिकरोड, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक प्रमाणे पाच संशयितांविरुध्द नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी गुरुवारी (दि.३१) गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी एकूण ४८ रिळ जप्त केले आहेत.

48 reels of nylon cats seized | नायलॉन मांजाचे ४८ रिळ जप्त

नायलॉन मांजाचे ४८ रिळ जप्त

Next
ठळक मुद्देपाच संशयितांविरुद्ध गुन्हे : चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई

नाशिक : मानवी जीवितासह पक्ष्यांच्याही जीवितासाठी धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर, विक्री व साठवणुकीवर जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे. परिमंडळ-२ मधील सातपूर, नाशिकरोड, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक प्रमाणे पाच संशयितांविरुध्द नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी गुरुवारी (दि.३१) गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी एकूण ४८ रिळ जप्त केले आहेत.

नायलॉन मांजाचा वापर आगामी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात पतंगबाजीसाठी वाढलेला दिसून येत आहे. यामुळे मुक्या पक्ष्यांसह नागरिकांना या मांजाचे ह्यघावह्ण सहन करावे लागत आहे. द्वारका येथे चार दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वार महिलेचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात चोरट्या मार्गाने होत असलेल्या नायलॉन मांजा विक्री व वापराचा प्रश्न चव्हाट्यावर आला. पोलीस आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-२मधील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक संशयित नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला आहे. नाशिकरोड भागात करण्यात आलेल्या कारवाईत एका मांजा विक्रेत्याच्या ताब्यातून तब्बल ३० रिळ जप्त केले गेले. इंदिरानगर, सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी चार रिळ पोलिसांनी जप्त केले. संबंधित संशयितांविरुध्द कलम-१८८नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा अथवा काचेचा मांजा वापरु नये तसेच पतंग, मांजा विक्रेत्यांनी आपल्या दुकानाबाहेर ठळकपणे ह्यनायलॉन मांजा बंदीह्णबाबत सूचना फलक लावून नायलॉन मांजा चोरट्या मार्गाने विक्री करण्याचे टाळावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे खरात यांनी सांगितले.

Web Title: 48 reels of nylon cats seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.