सुकेणेच्या पाणी योजनेसाठी ४.८० कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:32+5:302021-06-29T04:11:32+5:30

जल जीवन मिशनअंतर्गत निफाड तालुक्यातील ३३ गावांच्या प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने सुमारे ६३ कोटी १८ लाखांचा ...

4.80 crore sanctioned for dry water scheme | सुकेणेच्या पाणी योजनेसाठी ४.८० कोटींचा निधी मंजूर

सुकेणेच्या पाणी योजनेसाठी ४.८० कोटींचा निधी मंजूर

googlenewsNext

जल जीवन मिशनअंतर्गत निफाड तालुक्यातील ३३ गावांच्या प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने सुमारे ६३ कोटी १८ लाखांचा योजनेला मंजुरी दिल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा योजना शाखा अभियंता ए. बी. पाटील यांनी दिली. यात तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीच्या कसबे सुकेणे शहरासाठी ४ कोटी ८० लाखांची प्रस्तावित योजना मंजूर केली आहे. ३६ पाणी योजनांपैकी कसबे सुकेणेच्या पाणी योजनेचा निधी हा पिंपळगाव बसवंतनंतरचा सर्वाधिक निधी आहे. कसबे सुकेणे शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून ही योजना प्रस्तावित असून शहरालगतच्या नवीन नागरी वसाहती व गावातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार असल्याची माहिती सरपंच गीता गोतरने व उपसरपंच धनंजय भंडारे यांनी दिली.

पाणी योजनेवरून सध्या तालुक्यात आजी- माजी आमदाराच्या समर्थकांत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे समाजमाध्यमांवर दिसून येत आहे. पाणी योजना मंजूर झाल्याने कसबे सुकेणेकरांनी आंनद व्यक्त केला आहे.

मौजे सुकेणेला १ कोटी ४५ लाख, तर मौजे सुकेणे गावासाठी १ कोटी ४५ लाखाची पाणी योजना मंजूर झाल्याने ज्या कोणी राजकीय नेत्यांनी पाणी योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले, त्या सर्वांचे मौजे सुकेणेचे उपसरपंच सचिन मोगल यांनी आभार मानले आहेत. दरम्यान निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचा आणि पाणी योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तालुक्यातील राजकीय नेत्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर केला असल्याची माहिती सरपंच सुरेखा चव्हाण व उपसरपंच सचिन मोगल यांनी दिली.

Web Title: 4.80 crore sanctioned for dry water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.