जिल्ह्यात ४,८३८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:45+5:302021-05-03T04:10:45+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि.२) एकूण ३,६९१ इतक्या रुग्णांची वाढ झाली, तर सुमारे दुप्पट म्हणजे ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि.२) एकूण ३,६९१ इतक्या रुग्णांची वाढ झाली, तर सुमारे दुप्पट म्हणजे ४,८३८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३३ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३,५६८ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,१७९ तर नाशिक ग्रामीणला १,३७२१ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ४० व जिल्हाबाह्य १०० रुग्णबाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ८, ग्रामीणला २४ , मालेगाव मनपा १ असा एकूण ३३ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास होती. त्यात काहीशी घट झाली असली, तरीही नागरिक अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.
इन्फो
उपचारार्थी ३६ हजारांवर
जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सलग पाचव्या दिवशी अधिक आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३६,९०६ वर पोहोचली आहे. त्यात १९ हजार ३५६ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १५ हजार ५८१ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ७०७ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य २६२ रुग्णांचा समावेश आहे.
इन्फो
मृत्युमध्ये ग्रामीण तिप्पट
जिल्ह्यात मृत्युच्या संख्येत सातत्याने नाशिक शहरच आघाडीवर राहात होते. मात्र, गत पंधरवड्यापासून ग्रामीणचा बळींचा आकडा तुलनेत नाशिक शहरापेक्षा अधिक राहू लागला आहे. रविवारीही ग्रामीणमधील मृतांची संख्या २४ असून, ही बळींची संख्या शहराच्या तुलनेत तिप्पट आहे.