जिल्ह्यात ४,८३८ कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:16 AM2021-05-06T04:16:03+5:302021-05-06T04:16:03+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी (दि. ५) एकूण ४,११० इतक्या रुग्णांची वाढ झाली, तर ४,२७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी (दि. ५) एकूण ४,११० इतक्या रुग्णांची वाढ झाली, तर ४,२७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ४७ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३,६९२वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १,८९२ तर नाशिक ग्रामीणला २,०८७ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ८९ व जिल्हाबाह्य ४२ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १७, ग्रामीणला २४ , मालेगाव मनपा ६ असा एकूण ४७ जणांचा बळी गेला आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास होती. त्यात गत तीन दिवस काहीशी घट झाली होती. मात्र, बुधवारी पुन्हा मृतांच्या आकड्याने ४७पर्यंत मजल गाठल्याने आरोग्य यंत्रणेच्या काळजीत भर पडली आहे.
इन्फो
उपचारार्थी ३३ हजारांवर
जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या बाधितांच्या समकक्ष आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३३,८३७वर पोहोचली आहे. त्यात १६ हजार ४५४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १५ हजार ५२४ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ६५२ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य २०७ रुग्णांचा समावेश आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ८९ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ती ८९.०३ टक्क्यांवर पाेहाेचली आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९३.५१ टक्के, नाशिक शहर ९१.०६, नाशिक ग्रामीण ८६.०४ तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८३.६६ टक्क्यांवर पाेहोचला आहे.