जिल्ह्यात ४९ बाधित, ३३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 01:46 AM2022-06-25T01:46:24+5:302022-06-25T01:46:56+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी (दि. २४) ४९ रुग्ण आढळून आले. यात नाशिक शहरातील सर्वाधिक ४० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील ८, तर मालेगावी केवळ १ रुग्ण सापडला

49 affected, 33 corona free in the district | जिल्ह्यात ४९ बाधित, ३३ कोरोनामुक्त

जिल्ह्यात ४९ बाधित, ३३ कोरोनामुक्त

Next

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी (दि. २४) ४९ रुग्ण आढळून आले. यात नाशिक शहरातील सर्वाधिक ४० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील ८, तर मालेगावी केवळ १ रुग्ण सापडला. गुरुवारी जिल्ह्यात २४ बाधित आढळून आले होते. शुक्रवारी दिवसभरात ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या २४० वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असली, तरी नागरिकांना मास्क वापरण्याचा विसर पडू लागला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Web Title: 49 affected, 33 corona free in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.