फोनवरून ओटीपी विचारून ८९ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 03:34 PM2019-09-27T15:34:51+5:302019-09-27T15:39:10+5:30

नाशिक शहरात कामटवाडा येथील धन्वंतरी मेडीकल कॉलेजजवळील राहणाºया एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

49 thousand fraud by asking OTP over phone | फोनवरून ओटीपी विचारून ८९ हजारांची फसवणूक

फोनवरून ओटीपी विचारून ८९ हजारांची फसवणूक

Next
ठळक मुद्देडेबीट कार्डची गोपनीय माहिती विचारून फसवणूकअज्ञाताला ओटीपी सांगितल्याने 89 हजारांचा भूर्दंड

नाशिक : कामटवाडा येथील धन्वंतरी मेडीकल कॉलेजजवळील राहणाºया एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका अज्ञात व्यक्तीने कामडवाडा येथील भगवान पोपटराव बिरारी (५२) यांना २१ ते २३  असे सलग तीन दिवस  फोन करून आपण बँक आॅफ इंडियातून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या युनियन बँकेच्या डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेऊ न टप्प्या टप्प्याने पैसे काढून तीन दिवसात तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक  केली. विशेष म्हणजे बिरारी यांचे खाते युनियन बँक आॅफ इंडियाचे आहे.तर फोन कराणारा अज्ञात  स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगत बिरारी यांच्या डेबीट कार्ड सुरक्षितेतेविषयीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन  गोपनीय माहिती विचारत होता. असे असतानाही बिरारी यांनी त्यांना सलग तीन दिवस अज्ञात व्यक्तींना फोनवरून गोपीनीय माहिती सांगितल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.असताना या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोरसे तपास करीत आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस मोबाईल वरून बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या डेबीट कार्डची माहिती विचारून त्यांच्या खात्यातून अशाप्रकारे आॅनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.  

Web Title: 49 thousand fraud by asking OTP over phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.