इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात १८ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ५ बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 11:52 PM2021-05-10T23:52:41+5:302021-05-11T00:40:10+5:30
इगतपुरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. त्याकरीता इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात बालकांपासून १८ वर्षापर्यंतच्या मुलांकरीता ५ बेड आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
इगतपुरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. त्याकरीता इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात बालकांपासून १८ वर्षापर्यंतच्या मुलांकरीता ५ बेड आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
तिसऱ्या लाटेपूर्वीच लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यात १ लाख ४७ हजार चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय.
दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, आयसीयु मधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहे.
याच पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समितीने तालुक्यातील बालक ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण झाल्यास त्यावर त्वरित उपचार करण्यासाठी कोणतीही वैद्यकीय व्यवस्था नाही. त्यांना त्वरित उपचार मिळावे म्हणून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात ५ बेड राखीव ठेवावे अशा आशयाचे निवेदन वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांना देण्यात आले. त्यांनी या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत येत्या २ ते ३ दिवसात मुलांसाठी ५ बेड आरक्षित करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान ताप, सर्दी, खोकला, जुलाब, उलटी होणे, भूक न लागणे, जेवण नीट न जेवणे, थकवा जाणवणे, शरीरावर पुरळ उठणे, श्वास घेताना अडचण जाणवणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्यावा असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर, कृष्णा निकम, सुमित बोधक, निलेश खातळे, मंगला गायकवाड आदी उपस्थित होते.
कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे उलटत चालली आहे. गेल्या वर्षी, जेथे बहुतेक मुले एसिम्प्टोमॅटिक होते, म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. तर यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसर्या लाटेत प्रथम लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत. आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. अशी लक्षणे कोणा मुलांमध्ये आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
- डॉ. स्वरुपा देवरे, वैद्यकीय अधिक्षक, इगतपुरी.