शासकीय आरोग्यसेवेत १२५ डॉक्टर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:26 AM2019-09-06T00:26:35+5:302019-09-06T00:27:26+5:30
नाशिक : शासनाच्या आरोग्य विभागाला वारंवार जाहिरात प्रसिद्ध करूनदेखील तज्ज्ञ व एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांअभावी रुग्णांची गैरसोय होत होती. डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाकडून वारंवार जाहिरात प्रसिद्ध केली जात होती, मात्र वेतनश्रेणी तोकडी असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांसह एमबीबीएस डॉक्टरही शासकीय आरोग्यसेवेत येत नव्हते. वेतनश्रेणीत शासनाने वाढ केल्यानंतर जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत नव्याने १२५ डॉक्टर दाखल झाले आहेत. यामध्ये ३७ तज्ज्ञ डॉक्टर तर ८८ बीएएमएस आणि ६ एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयापासून मुंबई-आग्रा, नाशिक-पुणे, नाशिक-औरंगाबाद हे राष्टÑीय महामार्ग तर काही राज्य महामार्गही जातात. रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हृदयरोग व मेंदूविकार तज्ज्ञांची उणीव प्रकर्षाने जाणवत होती. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करताना मर्यादा येत होत्या. तसेच हृदयरोगाच्या रुग्णांचीदेखील तज्ज्ञ डॉक्टरांअभावी गैरसोय होत होती, मात्र शासनाने वेतनश्रेणीत वाढ केल्याने आता जिल्हा रुग्णालयाला मेंदूविकार व हृदयरोग तज्ज्ञांसह स्त्रीरोग तज्ज्ञ-१, बालरोग तज्ज्ञ-४, भूलतज्ज्ञ-३, भौतिक उपचार तज्ज्ञ-२, सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ-१ या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.ग्रामीण रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयांनाही तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञांचा समावेश आहे. मालेगावमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ-२, पेठ, इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १ स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती लवकरच होणार आहे. तसेच नांदगाव, मालेगाव, लासलगाव, घोटी, हरसूल या ठिकाणी प्रत्येकी १ भूलतज्ज्ञ नियुक्त केले जाणार आहेत.
‘बीएएमस’चा पर्याय
एमबीबीएस पदवीधारक डॉक्टर जिल्हा आरोग्य सेवेत येत नसल्यामुळे प्रशासनाला अखेर बीएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहेत. जिल्ह्यात अद्याप ४४ एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. अद्याप १३४ पैकी ९० डॉक्टर प्रशासनाला उपलब्ध झाले. त्यापैकी ३ एमबीबीएस डॉक्टर जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणार आहेत.