अध्यक्षांच्या भेटीत २१ कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 10:49 PM2020-02-05T22:49:34+5:302020-02-06T00:46:27+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मंगळवारी दुपारी अचानक जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची चौकशी करतानाच विनापरवाना गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेतली.

5 employees absent at the meeting of the president | अध्यक्षांच्या भेटीत २१ कर्मचारी गैरहजर

अध्यक्षांच्या भेटीत २१ कर्मचारी गैरहजर

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : परिचरांचे ब्लॅँकेट न वाटताच पडून

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मंगळवारी दुपारी अचानक जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची चौकशी करतानाच विनापरवाना गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेतली.
आठ विभागांना भेटी दिल्यानंतर रजेचा अर्ज न देताच सुमारे २१ कर्मचारी गैरहजर असल्याचे या भेटीतून आढळून आले. त्याचबरोबर परिचरांना वाटण्यासाठी दोन वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आलेले ब्लॅँकेट न वाटताच गुदामात पडून असल्याचेही यावेळी उघडकीस आले. या साºया प्रकाराची अध्यक्षांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाकडून खुलासा मागविला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली असून, खातेप्रमुखांच्या बैठका घेऊन निधी खर्चाचा आढावा घेण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास क्षीरसागर यांनी कोणालाही पूर्वसूचना न देता थेट वित्त विभागाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. त्यावेळी कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांची माहिती घेतली असता, सर्व कर्मचारी जागेवर असल्याचे दिसून आले. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाला भेट दिली असता, तेथेदेखील सर्व कर्मचारी जागेवर असल्याचे आढळून आले. लगतच्या समाज कल्याण विभागात मात्र दोन कर्मचारी विनापरवाना गैरहजर असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक शिक्षण विभागात दोन कर्मचारी तर ग्रामपंचायत विभागात एक कर्मचारी जागेवर नव्हता. लघुपाट बंधारे पश्चिम विभागात दोन, बांधकाम क्रमांक एकमध्ये चार, बांधकाम क्रमांक तीनमध्ये तीन व आरोग्य विभागात सात कर्मचारी रजेचा अर्ज न देताच कामावर गैरहजर असल्याचे आढळून आले.
या कर्मचाºयांचे रजेचे अर्ज आहेत किंवा नाही याची खात्री अध्यक्ष क्षीरसागर यांनी खाते प्रमुखांकडून करून घेतली असता, त्यात एकानेही रजेचा अर्ज दिलेला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अशा कर्मचाºयांकडून खुलासा मागविण्याच्या सूचना देण्यात
आल्या व खुलासा समर्पक न वाटल्यास संबंधित कर्मचाºयांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष क्षीरसागर यांनी सांगितले. दरम्यान, अध्यक्षांनी अचानक भेट दिल्यामुळे जिल्हा परिषदेत धावपळ उडाली होती. त्या त्या खात्याच्या कक्ष प्रमुखांनीही या पाहणीत भाग घेतला.

गुदामात वस्तू पडून
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या परिचरांना दर दोन वर्षांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार वुलनचा कपडा कोट तयार करण्यासाठी वाटप करण्यात येतो. दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारे वुलन खरेदी करण्यात आले होते. परंतु अर्थ विभागाने इगतपुरी व पेठ तालुक्यातील परिचरांसाठी त्याचे वाटपच केले नाही. अर्थ विभागाच्या गुदामात सदरचे कापड बांधून ठेवण्यात आल्याचे पाहून अध्यक्ष क्षीरसागर यांनी त्याबाबत विचारणा केली, परंतु त्याबाबत कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

Web Title: 5 employees absent at the meeting of the president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.