बागांमध्ये ४० टक्के द्राक्षे शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:31 PM2020-04-14T23:31:23+5:302020-04-15T00:01:15+5:30
द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे.
बाजीराव कमानकर ।
सायखेडा : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे.
यंदाच्या द्राक्ष हंगामात हजारो कोटींचा तोटा शेतकºयांना झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस सुरू होता त्यामुळे शेतकºयांनी द्राक्षबागांची छाटणी पुढे ढकलली होती. पावसामुळे गोड बारची छाटणी लांबणीवर गेल्याने द्राक्ष हंगामदेखील लांबला. दरवर्षी मार्च महिन्यात येणारे द्राक्षे एप्रिल महिन्यात विक्रीसाठी परिपूर्ण झाले. एप्रिल महिन्यात उन्हाळा सुरू होतो त्यामुळे द्राक्षबागांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. झालेही तसेच. मार्च महिन्यातच द्राक्ष बाजार भाव वाढू लागले. ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होण्यास सुरुवात झाली असतानाच अचानक जगभरात कोरोनाने थैमान घातले. भारतातही या रोगाने थैमान घातल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे अनेक व्यापाºयांनी द्राक्ष खरेदी बंद केली. आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झाले. देशांतर्गत राज्या-राज्यातील सीमा बंद केल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. त्यामुळे व्यापाºयांनी द्राक्ष बागांची खरेदी बंद केली. काही व्यापारी खरेदी करत होते, मात्र द्राक्ष घेण्यासाठी ग्राहक घर सोडून बाहेर येत नसल्याने द्राक्षांना कवडीमोल किंमत आली. अशा परिस्थितीमध्ये व्यापाºयांनी पूर्णपणे व्यवहार बंद केले. त्याचा फटका शेतकºयांना बसला.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतकºयांना द्राक्षबागा टिकवण्यासाठी खर्च करावा लागला. खर्च केलेल्या बागांना किमान ४० ते ५० रुपये दर मिळणे अपेक्षित होते; मात्र कवडीमोल भावामध्ये कोणी घेत नसल्याने शेतकºयांना तोटा सहन करावा लागत आहे. सरकारी यंत्रणा द्राक्ष निर्यात करू शकतो, असे सांगत असले तरी प्रत्यक्ष द्राक्ष खाणारा वर्ग हा शहरी भागातील असल्याने तो घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे खरेदी केलेला मालक कुणी घेत नसल्याने व्यापारी तोट्यात जाऊ लागल्याने खरेदी बंद केली आहे. संपूर्णपणे अशा नुकसान झालेल्या बागांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी. शेतकºयांचा झालेला लाखो रुपयांचा खर्च किमान मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.
कोल्ड स्टोरेज महागडे
बागांवर शिल्लक असलेल्या द्राक्षांचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांच्या समोर निर्माण झाला आहे. अनेक शेतकºयांनी कोल्ड स्टोरेजचा पर्याय निवडला. तो खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकºयांनी द्राक्षे तोडून जमिनीवर वाळत घातली आहेत तर काही स्वत: बेदाणा प्रक्रिया राबवत असले तरी त्यासाठी लागणारी सर्व औषधं, गंधक, धुणी देणे ही किचकट प्रक्रिया असल्यामुळे त्याचा किती फायदा होणार हे बेदाणा निर्मितीनंतर ठरणार आहे.
हंगाम तोट्यात
अनेक शेतकरी आपल्या द्राक्ष मण्यांचा बेदाणा तयार करत असल्याने बेदाणानिर्मिती वाढणार असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर होणार आहे. परिणामी यंदाचा द्राक्ष हंगाम पूर्णपणे तोट्यात गेला आहे. आधीच उत्पादकांनी बागांवर लाखो रुपयांचा खर्च करून ठेवला आहे.
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात लाखो रुपये खर्च करून द्राक्षबागा वाचवल्या. या द्राक्षबागांना किमान ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना रोगाचा परिणाम या द्राक्षबागांवर झाला. निफाड तालुक्यात आज हजारो हेक्टर क्षेत्र हे बागांच्या असल्याने जवळपास ८० टक्के शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांच्या द्राक्षबागा खाली झाल्या नाही, अशा शेतकºयांना शासनाने त्वरित नुकसनभरपाई द्यावी. - धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे