मोटार व्यवहारात फसवणूक करत ५ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 01:26 AM2022-03-14T01:26:48+5:302022-03-14T01:27:07+5:30
चारचाकी मोटारीचा विक्री करारनामा करून घेत रक्कम घेतल्यानंतर मोटार परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री करत सुमारे ४ लाख ८० हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित राहुल किसनचंद सचदेव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : चारचाकी मोटारीचा विक्री करारनामा करून घेत रक्कम घेतल्यानंतर मोटार परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री करत सुमारे ४ लाख ८० हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित राहुल किसनचंद सचदेव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, देवळालीगावातील मौलाना आझाद रोड येथील आकाश मधुकर फोकणे यांच्या फिर्यादीनुसार २७ ऑगस्ट २०१९ ते ८ मार्च २०२२ या कालावधीत टिळकपथ, आनंद बाजार येथील वकिलांच्या कार्यालयात संशयित सचदेव (रा. आनंद रोड, देवळाली कॅम्प) याने स्वतःची डिझायर कारच्या (क्र. एमएच १५ जीएफ ४५५५) विक्रीचा ऑगस्ट २०१९ साली करारनामा केला. तसेच या व्यवहारात फोकणे यांच्याकडून तीन लाख २० हजार रुपये रोख स्वरुपात घेतले. मात्र, गाडीचा ताबा दिला नाही. ही गाडी ४ फेब्रुवारी २०२१ साली संशयिताने दिनेश निंबाळकर नावाच्या व्यक्तीला परस्पर विक्री करत फसवणूक केली.
जुलै २०२० साली सचदेव याने फोकणे यांना कौटुंबिक अडचण सांगून एक महिन्याच्या बोलीवर एक लाख ६० हजार रुपये घेतले होते. फोकणे यांच्याकडून सचदेवने आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार रुपये घेऊन तीन लाखांचे दोन खोटे धनादेश देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास नाशिकरोड पोलिसांकडून केला जात आहे.