हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून पाच तासांत ५ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:57 AM2019-05-14T01:57:58+5:302019-05-14T01:58:42+5:30
शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्त्यावर होणारे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच हेल्मेट-सीट बेल्ट सक्तीची तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले.
नाशिक : शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्त्यावर होणारे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच हेल्मेट-सीट बेल्ट सक्तीची तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी (दि.१३) सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात २६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या पाच तासांत हेल्मेट न वापरणाºया ९४४ दुचाकीस्वारांवर कारवाई करत ४ लाख ७२ हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला, तर सीट बेल्टपासून विविध प्रकारे वाहतूक नियमांच्या उल्लंघनापोटी १ लाख ८ हजार ५०० रुपये बेशिस्त नाशिककरांनी पोलिसांकडे जमा केले.
शहर, परिसरात काल सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत हेल्मेट-सीट बेल्ट सक्ती तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली.
हेल्मेटमुळे वाचले पोलीस-युवकाचे प्राण
‘हेल्मेट है जरुरी, ना समझो इसे मजबुरी’ या प्रबोधनपर घोषवाक्याची प्रचिती सोमवारी पुन्हा आली. सातपूर येथून क र्तव्य आटोपून दुचाकीवरून घरी परतणाºया पोलीस कर्मचाºयाचा अपघात झाला. दुचाकींच्या या अपघातात दोघांनी हेल्मेट घातलेले असल्यामुळे दोघांच्या डोक्याला मार लागला नाही. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कासार हे ड्यूटी आटोपून मोटारसायकलने घरी जात असताना विरुद्ध दिशेने एक हेल्मेटधारक युवक भरधाव दुचाकीवरून (एमएच १५, एपी ६१३२) आल्याने त्याने कासार यांच्या बुलेटला धडक दिली. या अपघातात दोघेही रस्त्यावर कोसळले; मात्र सुदैवाने कासार यांनीही हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे त्यांच्याही डोक्याला मार लागला नाही व विरुद्ध दिशेने जाणाºया दुचाकीचालकाचेही डोके शाबूत राहिले. कासार यांच्या डाव्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्यावर मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तीन वाहनधारकांनी पाळला नाही सिग्नल
सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात केवळ तीन वाहनचालकांनी सिग्नल जम्पिंग केल्याची नोंद पोलिसांनी केली. त्यांच्याकडून ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच दुचाकीवर ट्रीपल सीट जाणारे केवळ ११ वाहनचालक पोलिसांना आढळून आले, तर वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणारे अवघे चार वाहनचालक पोलिसांच्या कारवाईत सापडले.
नियमबाह्य नंबरप्लेट प्रकरणी हजाराचा दंड
४नियमबाह्य वाहन क्रमांक असलेली एक व्यक्ती पोलिसांना या नाकाबंदीत आढळून आली हे विशेष. या व्यक्तीला १ हजार रुपये दंड करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी वाहतूक नियमांबाबत वाहनांची काटेकोर तपासणी केली.