कातरणीत ५ जागा बिनविरोध; ६ जागांसाठी १२ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:18 AM2021-02-27T04:18:25+5:302021-02-27T04:18:25+5:30

कातरणी येथील प्रभाग २ मधील सर्वसाधारण महिला जागेवर योगिता कदम, अनुसूचित जमाती जागेवर सुकदेव आहेर, प्रभाग ३ मधील सर्वसाधारण ...

5 seats unopposed; 12 candidates for 6 seats | कातरणीत ५ जागा बिनविरोध; ६ जागांसाठी १२ उमेदवार

कातरणीत ५ जागा बिनविरोध; ६ जागांसाठी १२ उमेदवार

Next

कातरणी येथील प्रभाग २ मधील सर्वसाधारण महिला जागेवर योगिता कदम, अनुसूचित जमाती जागेवर सुकदेव आहेर, प्रभाग ३ मधील सर्वसाधारण महिला जागेवर अलका सोनवणे, ओबीसी महिला जागेवर सरला सोनवणे व सरला शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

शुक्रवारी, (दि. २६) माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ जणांनी माघार घेतली.

प्रभाग एकमधील सर्वसाधारण जागेवर अशोक कदम व धोंडीराम कदम यांच्यात तर अनुसूचित जाती महिलेच्या जागेवर गीताबाई सोनवणे व सरिता सोनवणे यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग दोनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्या जागेवर अश्विनी संत व रेखा कदम या आमने-सामने आहेत तर प्रभाग चारमध्ये सर्वसाधारण जागेवर खंडू आहिरे, दत्तू कदम, मोहन कदम व योगेश पाटील यांच्यात सामना रंगणार आहे. तर महिलेच्या जागेवर निर्मला सोनवणे व उज्ज्वला लोहकरे यांच्यात लढत होणार आहे. सरपंच व सदस्य लिलाव प्रकरणामुळे यापूर्वी रद्द ठरविलेल्या कातरणी ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: 5 seats unopposed; 12 candidates for 6 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.