शिक्षण हक्कापासून ५० टक्के विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:59 AM2019-11-25T00:59:16+5:302019-11-25T00:59:37+5:30
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हाभरातील सुमारे १३०० विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.
नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हाभरातील सुमारे १३०० विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेऊन प्रत्यक्ष पात्रताधारकांऐवजी तांत्रिकदृष्टा प्रवेशप्रक्रियेचे निकष पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिले जात असल्याने अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत असून, किमान येणाºया शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रियेत तरी सुधारणा होण्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मागास व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागा राखीव आहेत. मात्र किचकट प्रवेशप्रक्रिया आणि कायद्यातील पळवाटांचा वापर करून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांमुळे जिल्हाभरातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत, तर चालू शैक्षणिक वर्षातही १३०० विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळू शकलेला नाही.
तब्बल चार महिने प्रवेशप्रक्रिया चालूनही १,२९९ विद्यार्थ्यांना जागा रिक्त राहिल्या आहेत. जागा रिक्त असूनही प्रवेश मिळणार नसतील तर शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आगामी शैक्षणिक वर्षात राखीव जागांवर प्रवेश मिळवू इच्छिणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रवेशप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
जिल्ह्यातील आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाºया १४ हजार ५७३ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७ हजार २७१ विद्यार्थ्यांचीच प्रवेशासाठी निवड झाली होती. उर्वरित ७ हजार ३०२ विद्यार्थ्यांना चार फेºयांमध्ये प्रवेशाची संधी मिळालेली नाही. अशा िस्थितीत तब्बल १३०० जागा रिक्त राहिल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे, तर आगामी वर्षात आपल्यांना आरटीईअंतर्गत राखीव जागांवर प्रवेश मिळवून देऊ इच्छिणाºया पालकांकडून आरक्षित जागा रिक्त असूनही मागास प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने आरटीई प्रवेशप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
आरटीई अंतर्गत वर्षनिहाय प्रवेश
शैक्षणिक वर्ष शाळांची संध्या उपलब्ध जागा प्रत्यक्ष प्रवेश
२०१२-१३ २३८ ३७७९ ५०६
२०१३-१४ २९२ ४६७३ ९४९
२०१४-१५ ३३७ ५५३३ १३३०
२०१५-१६ ३६७ ५८२७ २१५९
२०१६-१७ ३७२ ५९०० २१५७
२०१७-१८ ४५८ ६४३३ ३६४६