५ हजार ८२० रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:05+5:302021-04-05T04:14:05+5:30
जिल्ह्यातील दहा उत्पादक कंपन्यांकडून रुग्णालयांकरिता सद्यस्थितीत ८०.९१ मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून वरीलप्रमाणे रुग्णांची ...
जिल्ह्यातील दहा उत्पादक कंपन्यांकडून रुग्णालयांकरिता सद्यस्थितीत ८०.९१ मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून वरीलप्रमाणे रुग्णांची संख्यासाठी आवश्यक असलेले मेडिकल ऑक्सिजनचे प्रमाणाची कमाल संख्या ५६ मेट्रिक टन उपलब्ध असल्याचे सांगण्यात करण्यात आले आहे. ८०.९१ मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचे वितरण केल्यानंतर देखील २८.४४ मेट्रिक टनचा उर्वरित साठा शिल्लक रहाणार आहे. औषधाची व मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व उत्पादक,वितरक, रुग्णालयाचे प्रतिनिधी यांचेबरोबर समन्वय साधण्यात येत आहे.सद्य परिस्थितीत अन्न व औषध प्रशासन कार्यालय आठवड्याचे सर्व दिवस कार्यालयीन वेळेत सुरु रहाणार असून औषधाची व मेडिकल ऑक्सिजन संदर्भात अडचणी असल्यास ९८५०१७७८५३ व ९८६९११४९९८, ८७८०१८६६८२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधुरी पवार यांनी केले आहे.