पाच हजार विषयशिक्षक होणार मान्यताप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:46 PM2018-09-04T23:46:25+5:302018-09-04T23:47:05+5:30
नाशिक : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी असल्यामुळे शाळांना विषय शिक्षक मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने विषय शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात सुमारे ५ हजार शिक्षकांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची कार्यवाही प्रत्येक जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांनी सुरू केली असली तरी काही जिल्ह्णांना मात्र अजूनही प्रक्रिया राबविण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.
नाशिक : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी असल्यामुळे शाळांना विषय शिक्षक मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने विषय शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात सुमारे ५ हजार शिक्षकांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची कार्यवाही प्रत्येक जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांनी सुरू केली असली तरी काही जिल्ह्णांना मात्र अजूनही प्रक्रिया राबविण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने २०१२ पासून शिक्षक भरतीला मनाई केली आहे. जिल्ह्णांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली नसल्यामुळे खासगी आस्थापनांच्या शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव रखडले आहेत. २०१२ आणि त्यानंतर खासगी आस्थापनांमध्ये अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. मात्र शालेय शिक्षणात इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय महत्त्वाचे असल्याने खासगी शाळांनी आपल्या स्तरावर अशा शिक्षकांची नेमणूक करून त्यांचे प्रस्तावही मान्यतेसाठी शासनाकडे पाठविले, मात्र शासनाच्या धोरणानुसार त्यांना मान्यता देण्यात आलेले नव्हती. अशा प्रकारचे ५,२२७ च्या जवळपास विषय शिक्षक मान्यतेच्या प्रतीक्षेत होते. विषय शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषय शिक्षकांच्या मान्यतेला मान्यता देत येत्या सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.
मात्र आत्तापर्यंत राज्यातून जवळपास केवळ दीड हजार इतकीच प्रकरणे मंजुरीसाठी आली असल्याचे शिक्षण संचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. शिक्षक बदली, प्रशिक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षणाधिकारी अडल्यामुळे मान्य-तेच्या कामाला सुरुवात झालेली नाही. प्रस्तावाच्या त्रुटीपूर्ततेसाठी धावाधावशिक्षक भरतीप्रक्रिया बंद असल्यामुळे संस्थांनी शाळांची गरज लक्षात घेऊन शिक्षक नियुक्ती केली होती. राज्य शासनाने या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने विषय शिक्षकांच्या भरतीला हिरवा कंदील दिल्यामुळे कार्यवाही सुरू झाली आहे. तेव्हा सादर केलेल्या प्रस्तावांची विभागाने पडताळणीच केली नसल्यामुळे आता अनेक प्रकरणातील त्रुटी निघाल्याने या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी धावपळ होत आहे.माहिती मिळविण्यात अडचणी
राज्य शासनाने शिक्षक मान्यतेसाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत. मात्र या अटींनुसार कामकाज करताना शिक्षण विभागाची धावपळ होत आहे. शिक्षक मान्यता देताना आरक्षण, बिंदूनामावली, अनुशेषनुसार पदभरती केलेली नसल्यास मान्यता देऊ नये, अतिरिक्त उमेदवाराल रुजू करून घेतले नसेल तर मान्यता देऊ नये, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव अमान्य करताना कोणतेही एक कारण न देता सर्व कारणे स्पष्ट नमूद करावीत, अशा अटी असल्याने शिक्षण विभाग सवडीनुसार काम करताना दिसत आहे.