५० एकर शेती पूरपाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 09:41 PM2020-06-18T21:41:16+5:302020-06-19T00:17:17+5:30
कसबे सुकेणे : मुसळधार पावसामुळे आडगाव, सय्यदपिंप्री शिवारातील ओढा-नाल्यांचे पूरपाणी निफाड तालुक्यातील खेरवाडीच्या हनुमाननगर शिवारात जमा होत असल्याने सुमारे पन्नास एकरहून अधिक शेती पूरपाण्याखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे सुकेणे : मुसळधार पावसामुळे आडगाव, सय्यदपिंप्री शिवारातील ओढा-नाल्यांचे पूरपाणी निफाड तालुक्यातील खेरवाडीच्या हनुमाननगर शिवारात जमा होत असल्याने सुमारे पन्नास एकरहून अधिक शेती पूरपाण्याखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
मृग नक्षत्राच्या कोसळधारेमुळे नाशिकच्या आडगाव, सिद्धपिंप्री या पूर्व भागातील ओढे-नाल्यांना दररोज पूर येत असल्याने हे पूरपाणी खेरवाडी, चितेगाव व चांदोरी शिवारात जमा होत आहे. त्यामुळे या शिवारात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पेरणी केलेले बियाणे वाहून गेले असून, द्राक्षबागांमध्ये गुडघ्यावर पाणी आहे. ऊस, कोथिंबीर, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जगन्नाथ जाधव, बाळासाहेब संगमनेरे, दत्तात्रय संगमनेरे, माणिक जाधव, रमेश संगमनेरे, निवृत्ती संगमनेरे, लालाजी संगमनेरे, ज्ञानेश्वर संगमनेरे, शांताराम संगमनेरे, विश्वनाथ संगमनेरे, बाळासाहेब संगमनेरे यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकºयांची मागणी आडगाव-सय्यदपिंप्री-खेरवाडी-सुकेणे असा हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या रस्त्यावर पिंप्री ते ओणेदरम्यान चार ओहळ असून, ओहळाला पावसाळ्यात पूर येऊन रस्ता बंद होत आहे. या नाल्यावरील फरशी पुलांची उंची वाढवून ओहळांचे खोलीकरण केले तर शेतपिकात पूरपाणी घुसणार नाही, याकडे शासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.पूरपरिस्थितीने शेतकरी हवालदिल गेल्या पाच दिवसांपासून ओढे-नालेलगतच्या शेतात व द्राक्षबागेत पूरपाणी असून, शेतकामे ठप्प झाली आहेत. मुख्य रस्त्यावरून वस्तीवर येणारे रस्ते पाण्यात असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या शिवाराला पूरपाण्याचा तडाखा बसत आहे.
नव्याने लागवड केलेल्या कोबी, कोथिंबीर, मेथी, टमाटा, वांगे, भेंडी, गवार, सोयाबीन यांसारखी पिके शेतकºयांच्या हाताबाहेर जात आहे. महागडी बियाणे आणि रोपे खरेदी करून शेतकºयांनी लागवड केली होती; परंतु पूरपाण्याने नुकसान केले असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. मुसळधार पावसामुळे ओढा-नाल्याचे पूरपाणी शेतात साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील ५० एकर अधिक पिके व बागांचे नुकसान झाले आहे.
- समाधान संगमनेरे, शेतकरी, खेरवाडी.