देवळालीच्या कोविड सेंटरमध्ये ५० बेड पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:42 PM2020-09-09T23:42:36+5:302020-09-10T01:16:16+5:30
देवळाली कॅम्प : कोरोनाचे संकट सर्वत्र गडद होत असताना व जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नसताना देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने हायस्कूलमध्ये तयार केलेल्या कोविड सेंटरमध्ये केवळ प्रशिक्षित डॉक्टर व स्टाफ नसल्याने ५० बेड आजही रिकामे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नगरसेवकांनी टीका केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

याबाबत बोर्ड प्रशासनाने जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती दिली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी बेड मिळत नसताना देवळालीत निव्वळ डॉक्टरांअभावी ५० बेड पडून आहेत.केवळ २० रुग्ण दाखल : ९० रुग्ण घरीचजिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली व्यवस्था केली जात आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ९० खाटांची व्यवस्था असून, या ठिकाणी कोरोना रुग्ण दाखल करण्यात आले आहेत, तर ९० रुग्णांना घरी क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. याशिवाय तातडीची गरज म्हणून बोर्डाच्या शाळेत ७० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी २० रुग्णांसाठी एक डॉक्टर असे समीकरण असून, सध्या डॉक्टरांच्या संख्येवर तेथे २० रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. मात्र प्रशिक्षित डॉक्टर व स्टाफ दिले जात नसल्याने ५० बेड रिक्त पडून आहेत.कॅन्टोन्मेंटकडे केवळ दोन आॅक्सिजन सिलिंडर असून, आॅक्सिजन बेड पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टाफ कोणत्याही सुट्ट्या न घेता सतत काम करीत आहेत. सुरुवातीला रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने दिलेले जेवणही आता बंद केल्याने नवीन समस्या उभी राहिली आहे, तर शासनाने आतापर्यंत केवळ ३० लाख रुपये अनुदान दिले असल्याने आर्थिक संकटदेखील उभे राहिले आहे.
-भगवान कटारिया