सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक, अहमदनगर उपकेंद्रांसाठी ५० कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:46 PM2018-09-20T13:46:29+5:302018-09-20T13:53:05+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रला प्रशासकीय मंजूरी द्यावी, तसेच उपकेंद्रांच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, यासाठी विद्यापीठाचो सिनेट सदस्य अमित पाटील व आमदार अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांना उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधीच्या मागणीचे निवेदन दिले.

50 crore demand for Savitribai Phule Pune University's Nashik, Ahmednagar sub station | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक, अहमदनगर उपकेंद्रांसाठी ५० कोटींची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक, अहमदनगर उपकेंद्रांसाठी ५० कोटींची मागणी

Next
ठळक मुद्देनाशिक अहमदनगर उपकेंद्रासाठी पन्नास कोटींची मागणी अनिल कदम, अमित पाटील यांनी घेतली तावडेंची भेट

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यानाशिक व अहमदनगर उपकेंद्रला प्रशासकीय मंजूरी द्यावी, तसेच उपकेंद्रांच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, यासाठी विद्यापीठाचो सिनेट सदस्य अमित पाटील व आमदार अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांना उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधीच्या मागणीचे निवेदन दिले. तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयातही देण्यात आले. 
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे तर नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र लातूर येथे आहे. त्याच धर्तीवर नाशिक व अहमदनगर या  उपकेंद्रांच्या  सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. यापूर्वी अमित पाटील यांनी राज्यपाल व शिक्षणराज्य मंत्री तसेच विद्यापीठाटे  कुलगुरू यांनाही निवेदन दिले होते. नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ उपकेंद्राचे सक्षमीकरण होणे गरजचे अशल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. जिल्हातील कृषिक्षेत्रामधे द्राक्षे व कांदा यांच्याशी निगडीत मोठे व्यापार केले जातात . विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकमध्ये आल्यास वायनरी अभ्यासक्र म तसेच अन्नधान्य प्रक्रि या उद्योग अभ्यासक्र म, पर्यटन अभ्यासक्र म,आयात - निर्यात संदर्भात अभ्यासक्र म व नाशिक जिल्ह्यातील विविध मोठे कारखाने यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्र म सुरू केले जाऊ शकतात, असे झाल्यास जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊन व्यवसाय करण्याची संधीही उपलब्ध होणे शक्य असल्याने नाशिकचे उपकेंद्र लवक रात लवकर उभे राहावे यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. 

पहिल्या टप्प्यात किमान दहा कोटी मिळावे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ६३ एकर जागा नाशिकमधे आरक्षित करण्यात आलेली असून केवळ निधी होऊ न शकल्याने बांधकाम सुरू होऊ शकलेले नाही. निधी उपलब्ध झाल्यास या जागेवर बांधकाम सुरू होऊ शकणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात किमान १० कोटी रु पयांचा तरी निधी देऊन या कामाला सुरु वात करावी, अशी मागणी आमदार अनिल कदम व सिनेट सदस्य अमित पाटील यांनी विनोद तावडे यांनी केली.  

Web Title: 50 crore demand for Savitribai Phule Pune University's Nashik, Ahmednagar sub station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.