आरंभ महाविद्यालयातील प्रदर्शनात ५0 प्रतिकृती

By admin | Published: March 10, 2016 11:49 PM2016-03-10T23:49:52+5:302016-03-10T23:54:12+5:30

कचरा प्रकल्पावर भर : नावीन्यपूर्ण प्रयोग

50 facsimile display in the opening of the college | आरंभ महाविद्यालयातील प्रदर्शनात ५0 प्रतिकृती

आरंभ महाविद्यालयातील प्रदर्शनात ५0 प्रतिकृती

Next

नाशिकरोड : जेलरोड येथील आरंभ महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी ५० प्रतिकृती सादर केल्या होत्या. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. वैजयंती पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्र. ला. ठोके, प्रा. वसंत जोशी, प्रा. रेखा टर्ले, प्रा. प्रदीप वाघ, संगीता पवार आदि उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात कचरा व्यवस्थापन रोबोट, सुरक्षा यंत्रणा, मॅग्नेटीक बॉल, हायड्रोपोनिक्स, विंडमिल, विद्युत बचाव यंत्र, ज्वालामुखी, प्रदूषणाचे परिणाम, फोटोस्टॅटीक सोलर, मॅजिकल वॉटर टॅब, टेरॅरिअम, रस्ता सुरक्षा, अन्नभेसळ आदि ५० प्रतिकृती सादर केल्या होत्या. परीक्षण स्वप्ना मालपाठक, स्मिता चव्हाण यांनी केले. यावेळी प्रा. प्रतिभा पंडित, प्रा. सुवर्णा धामणे, प्रा. शैलजा उघाडे, प्रा. वैशाली पगारे, प्रा. आरती कोठावदे, प्रा. भारत खंदारे, प्रा. विलास सानप, प्रा. अमोल टेमक, सुधाकर मुठाळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 50 facsimile display in the opening of the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.