जिल्ह्यात नवीन ५० रुग्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:53 AM2020-05-29T00:53:19+5:302020-05-29T00:54:58+5:30
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.२८) ५० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या १ हजार १०८ झाली
नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.२८) ५० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या १ हजार १०८ झाली
आहे. मालेगावमध्ये ३२, नाशिक शहरात १३, ग्रामीणमध्ये ३ व जिल्ह्याबाहेरचे दोन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकूण ७८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये सलग दुसºया दिवशी ३२ रुग्ण आढळून आले. नाशिक शहरातही सलग दुसºया दिवशी १३ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने आता शहराचा आकडाही वाढू लागला आहे. जिल्ह्यात अद्याप एकूण ६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात फैलावणारा कोरोना आजार वेळीच नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य प्रशासनापुढे उभे राहिले आहे.
गुरुवारी (दि.२८) ५० बाधित आढळून आले. काठेगल्लीतील बाधितांच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नांदगाव, ओझर व दिंडोरी येथील प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे.