शहरात १३ कोरोनाग्रस्त : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ५० नव्या रुग्णांची भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 10:05 PM2020-05-28T22:05:21+5:302020-05-28T22:09:40+5:30

नाशिककरांनी आता लॉकडाउन शिथिलतेचा गैरफायदा घेणे तत्काळ थांबवून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

50 patients in district for second day in a row! | शहरात १३ कोरोनाग्रस्त : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ५० नव्या रुग्णांची भर !

शहरात १३ कोरोनाग्रस्त : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ५० नव्या रुग्णांची भर !

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगावात पुन्हा ३२ नवे रुग्ण ७८६ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी गुरूवारी (दि.२८) रात्री नऊ वाजेपर्यंत ५० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णसंख्या आता १ हजार १०८ इतकी झाली आहे.
गुरु वारी मालेगावमध्ये सर्वाधिक ३२, नाशिक शहरात १३, नाशिक ग्रामीणमध्ये ३ व जिल्ह्याबाहेरचे दोन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण ७८६ रु ग्ण कोरोनामुक्त झाले असून, ६० जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये सलग दुसºया दिवशी ३२ रुग्ण आढळून आले आहे. एकूणच मालेगावमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. तसेच नाशिक शहरातही सलग दुसºया दिवशी १३ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने आता शहराचा आकडाही वाढू लागला आहे. जिल्ह्यात अद्याप एकूण ६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील ग्रामिण भागात फै लावणारा कोरोना आजार वेळीच नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य प्रशासनापुढे उभे राहिले आहे. नाशिककरांनी आता लॉकडाउन शिथिलतेचा गैरफायदा घेणे तत्काळ थांबवून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, बुधवारी (दि.२७) जिल्ह्यात दिवसभरात ५८ रु ग्ण आढळून आले. त्यानंतर गुरु वारी (दि.??) ५० कोरोनाबाधित आढळून आले. त्याचप्रमाणे काठे गल्ली येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा अहवाल पॉझििटव्ह आला. त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीणमधील नांदगाव, ओझर व दिंडोरी येथील प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्याबाहेरील जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील एक व कळवा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नाशिक शहरात १३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एका मोठ्या महिला लोकप्रतिनिधीचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे काठे गल्ली येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तसेच पखालरोड येथील मयत झालेल्या कोरोनाबाधित वृद्धाच्या संपर्कात आलेली २ वर्षाच्या चिमुकलीलाही कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. एका मेडिकलमध्ये काम करणा-या जुन्या नाशकातील दूधबाजारातील ३० वर्षाच्या तरूणालाही कोरोनाची बाधा झाली. नाईकवाडीपुरा अजमेरी चौकातील येथील ५४ वर्षांच्या पुरूषाचाही अहवालही पॉझिटिव्ह आला. एकूण जुन्या नाशकात आता कोरोनाबाधितांची संख्या सुमारे नऊ झाली आहे.
तसेच जत्रा हॉटेल परिसरातील ३३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. वडाळागावातील मुमताजनगर भागात १० वर्षाच्या मुलीलाही कोरोनाची बाधा झाली. येथील रजा चौक भागातील तीघांपैकी दोघे मायलेक कोरोनामुक्त होऊन गुरूवारी घरी परतले.
----
जिल्ह्यात २१० संशयित दाखल
जिल्ह्यात गुरु वारी २१० संशियत रु ग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यात नाशिक शहरात १०७, मालेगाव शहरात २०, नाशिक ग्रामीणमध्ये ८२ व एक संशियत घरातच उपचार घेत आहे. गुरु वारी जिल्ह्यात २२२ कोरोनाबाधित रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. एकूण ४६० अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

Web Title: 50 patients in district for second day in a row!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.