नाईक संस्थेसाठी दुपारपर्यंत ५० टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 02:39 PM2019-07-20T14:39:21+5:302019-07-20T14:44:40+5:30

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून दुपारी दोनवाजेपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. संस्थेच्या चार हजारहून अधिक  सभासदांनी दुपारपर्यंत मतदाना हक्क बजालवला असून नाईक संस्थेच्या मुख्यालयातील तीनही इमारतींमधील ३९ बूथवर मतदानासाठी मतदारांच्या रागां लागलेल्या दिसून येत आहे. 

50 percent polling for the Naik organization | नाईक संस्थेसाठी दुपारपर्यंत ५० टक्के मतदान 

नाईक संस्थेसाठी दुपारपर्यंत ५० टक्के मतदान 

Next
ठळक मुद्देनाईक संस्थेच्या मतदानासाठी सभासदांची गर्दीदुपारपर्यंत 50 टक्के मतदारांनी बजावला हक्क किरकोळ कुरुबुरी वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून दुपारी दोनवाजेपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. संस्थेच्या चार हजारहून अधिक  सभासदांनी दुपारपर्यंत मतदाना हक्क बजालवला असून नाईक संस्थेच्या मुख्यालयातील तीनही इमारतींमधील ३९ बूथवर मतदानासाठी मतदारांच्या रागां लागलेल्या दिसून येत आहे. 
नाईक शिक्षण संस्थेचे एकून ८ हजार ६९४ सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजवाला आहे. नाईक महाविद्यालयातील तीन इमारतींमधील ३९ बुथवर ४०० मतदान कर्मचारी व १०० मदतनिसांच्या माध्यमातून ही मतदानप्रक्रिया राबविली जात आहे.  संस्थेच्या ज्येष्ठ विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सदस्य अशा एकूण २९ जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात असून या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनल व विरोधकांच्या क्रांतीपॅनलमध्ये चुरशीची लढत सुरू असून दोन्ही गटांक डून मतदांना मतदान केंद्रापर्यंत आणून अधिकाधिक मतदान करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहे, तर दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचे कार्यक र्ते महाविद्यालयांच्या प्रांगणात आणि आवारात जमून मतदारांना आपल्या उमेदवाराच्या चिन्हाविषयी माहिती करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्साहाच्या भरात काही कार्यकर्ते मतदार केंद्रांच्या आवारात शिरकाव करीत असल्याने पोलिसांकडून त्यांना नियमित बाहेर काढण्याचे काम सुरू असून या प्रकारात काही ठिकामी कार्यकर्ते आणि उमेदवारांकजून कुरबूर होत असली तर निवडणूक मंडळाचे सदस्य व पोलीस यंत्रणेच्या साह्याने अशा प्रकार नियंत्रित करून सबंधितांना बाहेर काढले जात आहे. दरम्यान. मतदान प्रक्रियेला  सकाळी ७ वाजापासून सुरूवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे. मतदारांना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व सहचिटणीस पदासाठी प्रत्येकी एक मतदान करता येणार आहे, तर विश्वस्त गटासाठी सहा उमेदवारांना मतदान करता येणार आहे. नाशिक गटात चार उमेदवार निवडून देण्याचा अधिकार मतदारांना असेल, तर सिन्नर गटात तीन, निफाड-चांदवड गटात तीन,  येवला-मालेगाव गटात दोन, नांदगाव, बागलाण व कळवण गटात दोन उमेदवारांना मतदान करता येणार आहे. स्त्री राखीव गटात दोन उमेदवारांना सभासदांना मतदान करता येणार आहे. असे एकूण २९ उमेदवार या निवडणुकीतून निवडण्यासाठी दिवसभरात ८ हजार ६९४ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

Web Title: 50 percent polling for the Naik organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.