मालेगाव बंदोबस्तावरील ५० पोलीस क्वॉरन्टाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:34 PM2020-06-06T20:34:58+5:302020-06-07T00:47:52+5:30

कोरोना संसर्गाच्या पाशर््वभूमीवर मालेगाव येथे बंदोबस्तावर असणार्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील सुमारे ५० पोलीस कर्मचाऱ्यांना मुसळगाव येथील इंडियाबुल्सच्या वसतिगृहात क्वॉरेन्टाईन करण्यात आले आहे. चौदा दिवसांचा कालावधी संपल्यावर हे कर्मचारी आपापल्या घरी जाऊ शकणार आहेत.

50 police quarantine on Malegaon security | मालेगाव बंदोबस्तावरील ५० पोलीस क्वॉरन्टाईन

मालेगाव बंदोबस्तावरील ५० पोलीस क्वॉरन्टाईन

Next

सिन्नर : कोरोना संसर्गाच्या पाशर््वभूमीवर मालेगाव येथे बंदोबस्तावर असणार्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील सुमारे ५० पोलीस कर्मचाऱ्यांना मुसळगाव येथील इंडियाबुल्सच्या वसतिगृहात क्वॉरेन्टाईन करण्यात आले आहे. चौदा दिवसांचा कालावधी संपल्यावर हे कर्मचारी आपापल्या घरी जाऊ शकणार आहेत.
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मालेगाव मध्ये ग्रामीण पोलीस दलातील ४५ वर्षे वयाच्या आतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या कर्मचाºयांचा तेथील नियुक्ती कालावधी संपल्यानंतर थेट घरी जाऊ न देता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सिंग यांच्या आदेशाने मुसळगाव येथील इंडियाबुल्सच्या आवारत असणार्या वस्तीगृहात चौदा दिवसांसाठी क्वॉरेन्टाईन करण्यात येत आहे.
या वस्तीगृहाची संपूर्ण व्यवस्था ग्रामीण पोलिस दलाकडे असून सिन्नर, एमायिडसी व वावी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तेथील व्यवस्था बघणार आहेत. गुरु वारी सायंकाळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी माधव रेड्डी यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
सिन्नर चे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अशोक राहाटे, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे हे यावेळी उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वीच मालेगाव बंदोबस्त करून सुटलेल्या जिल्हा पोलिस मुख्यालयातील राखीव कर्मचारी, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी व जिल्हा विशेष शाखांचे कर्मचारी मिळून ४९ जणांना याठिकाणी आणण्यात आले आहे. त्या सर्वांची देवपूर आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन वसतीगृहात रवानगी करण्यात आली . या वस्तीगृहात ४६ खोल्या असून प्रत्येक खोलीत दोन याप्रमाणे पोलीस कर्मचार्यांना ठेवण्यात येणार आहे.

Web Title: 50 police quarantine on Malegaon security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.