५० हजारांची लाच घेताना अटक
By admin | Published: April 22, 2017 01:07 AM2017-04-22T01:07:17+5:302017-04-22T01:07:29+5:30
जायखेडा/नामपूर : पोलीस नाईक विक्रम घोलप यास येथील वाळूविक्रेत्याकडून तब्बल ५० हजार रु पयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली
जायखेडा/नामपूर : येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक विक्र म चंद्रकांत घोलप यास नंदुरबार येथील वाळूविक्रेत्याकडून तब्बल ५० हजार रु पयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली
नंदुरबारकडून जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होते. वाळू वाहतूक अडचणीविना सुरळीत चालावी यासाठी जायखेड्याचे पोलीस नाईक विक्र म घोलप यांच्याकडून वारंवार पैशांची मागणी होत होती. संबंधित वाळूविक्रेत्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आज दुपारी डंपर (क्र. एमएच ३९ सी १००१) वाळू घेऊन नामपूर परिसरात आला असता घोलपने त्यास अडवून पैशाची मागणी केली.
फोनवर ठरल्याप्रमाणे वाळूचा ट्रक सोडण्यासाठी पन्नास हजार रुपयाची मागणी केली. नामपूर पोलीस
दूरक्षेत्र कार्यालयात सापळा रचून ५० हजारांची लाच घेताना घोलप यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. या पथकात पोलीस निरीक्षक बाळासाहेब बढे, संदीप पवार, भारत पाटील, पवार यांच्या समावेश होता. घोलप याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)