जनकल्याण समितीकडून तीन गावांना ५० टन चारावाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 03:40 PM2019-06-20T15:40:51+5:302019-06-20T15:41:01+5:30
पांगरी : सिन्नर तालुक्यातील दुष्काळात होरपळणाऱ्या जनावरांसाठी राष्टÑीय स्वयंसेवक संघ संचलित जनल्याण समितीच्या वतीने पांगरी, भोकणी व म-हळ येथे ५० टन हिरवा चारावाटप करण्यात आला.
पांगरी : सिन्नर तालुक्यातील दुष्काळात होरपळणाऱ्या जनावरांसाठी राष्टÑीय स्वयंसेवक संघ संचलित जनल्याण समितीच्या वतीने पांगरी, भोकणी व म-हळ येथे ५० टन हिरवा चारावाटप करण्यात आला. तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे वाड्या-वस्त्यांवर विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांच्या चाºयाचा व पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने तालुक्यात शेतकऱ्यांनी काहीअंशी आधार मिळावा, यासाठी चारावाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत भोकणीत २५ किलो प्रति जनावर याप्रमाणे ५०० जनावरे, पांगरीत १ हजार, मºहळ येथे ५०० जनावरे अशा प्रकारे ५० टन चारा वाटप करण्यात आला. यावेळी जनकल्याण समितीचे पश्चिम महाराष्टÑ प्रांतचे अध्यक्ष गणेश बागदरे, उपाध्यक्ष गंगाधर वाघ, भास्कर सोहनी, कार्यवाह मदन मुंगटे, एन. एल. जोशी, समाधान गायकवाड, ज्ञानेश्वर कुºहाडे, दीनानाथ कलकत्ते, सुभाष पगार आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.