जिल्ह्यात आरोग्य केंद्रांतील ५० टक्के जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:14 AM2021-02-10T04:14:42+5:302021-02-10T04:14:42+5:30
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ११० प्राथमिक आरोग्य केंद्रे व १,०९२ आरोग्य केंद्रे कार्यरत असून, ग्रामीण व अति दुर्गम ...
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ११० प्राथमिक आरोग्य केंद्रे व १,०९२ आरोग्य केंद्रे कार्यरत असून, ग्रामीण व अति दुर्गम भागात आरोग्यसेवा पुरविण्यात ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत आहे. पंधरापैकी आठ तालुके आदिवासी असल्यामुळे या भागात आरोग्यसेवा देण्यास वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कायमच नाखूश असतात. त्यातूनच ही पदे रिक्त राहात असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र, असे असले, तरी ज्या आरोग्य केंद्रांवर कमतरता असेल, अशा केंद्राच्या लगतच्या केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्पुरती नियुक्ती देऊन रुग्णसेवा अविरत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
----------------
११० प्राथमिक आरोग्य केंद्रे
१०,९२ आरोग्य उपकेंद्रे
---------
प्राथमिक आरोग्य केंद्र
११०- ११६९
उपकेंद्र
१०९२- ५३२
-------------
ग्रामीण भागात सेवा देण्यास डॉक्टर अनुत्सुक
लाखो रुपये वैद्यकीय शिक्षणासाठी खर्च केलेल्या डॉक्टरांचा पदवी मिळाल्यानंतर अधिकाधिक पैसे कसे मिळतील, याकडे कल असतो. शासनाने नवीन डॉक्टरांना काही काळासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा सक्तीची केली असली, तरी अवघ्या महिना, दोन महिन्यांतच नवीन डॉक्टर न सांगता आपली सेवा समाप्त करून गायब होत असल्यामुळेच पदे रिक्त राहतात.
---------
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. डॉक्टर वा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम होतो, अशी तक्रार मात्र नाही. शासनाने काही प्रमाणात रिक्त पदे भरण्याची अनुमती दिली आहे. कंत्राटी पद्धतीने ती भरली जातील.
- डॉ.कपील आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी