पाटणेत ५० जणांचे लसीकरण, ३५ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:12 AM2021-04-05T04:12:54+5:302021-04-05T04:12:54+5:30
लसीकरणाचा प्रारंभ सरपंच राहुलाबाई आहिरे, माजी प्राचार्य बी.के. आहिरे, माजी सरपंच नथू खैरनार, अशोक वाघ, संदेश खैरनार, माजी सरपंच ...
लसीकरणाचा प्रारंभ सरपंच राहुलाबाई आहिरे, माजी प्राचार्य बी.के. आहिरे, माजी सरपंच नथू खैरनार, अशोक वाघ, संदेश खैरनार, माजी सरपंच नंदा अहिरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यधिकारी डाॅ. सारिका मेरगळ, पाटणे उपकेद्रांच्या प्रमुख डॉ. वैशाली मंडलिक, पोलीस पाटील रवींद्र खैरनार, राजेश धनवट, संदीप बागुल, नानाभाऊ निकम, कारभारी पवार, आरोग्यसेविका सुरेखा देवरे, आरोग्य सेवक अरुण पाटील, आशाताई मनीषा त्रिभुवन, कविता खैरनार, जयश्री विखे, वैशाली बागुल आदी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेचा शुभारंभप्रसंगी आरोग्य अधिकारी डाॅ. सारिका मेरगळ यांनी लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली.
माजी प्राचार्य बी.के. आहिरे यांनी कोविशील्ड ही लस नागरिकांसाठी पूर्णतः सुरक्षित असून लसीकरणाला न घाबरता सर्वांनी वेळेवर लसीकरण करून आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी जेष्ठ नेते अशोक वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नागरिकांची प्रथमत: अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यांनतर तापमान, पल्स, ऑक्सिजन लेव्हल आदी तपासणी करण्यात आली. नंतर लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. पाटण्यातील कोरोनाचा वाढता धोका कमी करण्यासाठी तसेच कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या लसीकरणास पाटणे ग्रामस्थाचा चांगला प्रतिसाद मिळाला.