कामगार शक्ती फाउण्डेशनकडून महिलांना ५ हजार सॅनिटरी पॅड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:23 AM2019-08-18T00:23:47+5:302019-08-18T00:25:06+5:30
सिन्नर : येथील कामगार शक्ती फाउण्डेशन आणि नाशिक महिला गृह उद्योग व वुमेन्स हेल्थकेअर बिझनेस सिस्टीम यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त मुली व महिलांसाठी ५ हजार सॅनिटरी पॅड पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : येथील कामगार शक्ती फाउण्डेशन आणि नाशिक महिला गृह उद्योग व वुमेन्स हेल्थकेअर बिझनेस सिस्टीम यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त मुली व महिलांसाठी ५ हजार सॅनिटरी पॅड पाठविण्यात आले. पूरग्रस्त महिलांसाठी सॅनिटरी पॅडचे ५ हजार पॅकेटचे पॅकिंग करण्यात आले.
यावेळी महिला गृह उद्योगाच्या अध्यक्ष सुषमा नाईकवाडी, वुमन्स हेल्थकेअर बिझनेस सिस्टीमच्या चीफ प्रमोटर प्रमिला सरवार, रुपल डिंगोरे, जयश्री भोसले, स्मिता कदम, स्वाती गिरी, सुमन धांड, नम्रता नवले, विजया सरवार, शोभा सरवार, कीर्ती सरवार, अश्विनी
वैद्य, योगीता देवरे, श्रद्धा पाचपुते, योगीता मांडे, अरुणा सलते, रश्मी सोगे, ज्योती दशपुते, पूनम
यादव, मनीषा जाधव, मंदा सोनवणे, सुरेखा वाघ यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.