भागीदारीच्या आमिषाने ५१ कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:31 AM2017-09-14T00:31:25+5:302017-09-14T00:32:55+5:30
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील टाकण्यात येणाºया नवीन कंपनीत पंचवीस टक्के भागीदाराचे आमिष दाखवत द्वारका परिसरातील एकाच्या कागदपत्रांवर सह्णा घेऊन बँकेकडून ५१ कोटी रुपयांचे कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार लखमापूर येथील श्री सप्तशृंगी इस्पात प्रा़ लिमिटेड कंपनीच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारका परिसरातील गणेशबाबा नगरमधील अरोरा हाउसमध्ये संजय नारायणप्रकाश अरोरा राहतात़ नोव्हेंबर २०११ ते मार्च २०१६ पूर्वी संशयित अभिषेक बद्री जयस्वाल व दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे असलेल्या श्री सप्तशृंगी इस्पात प्रा़ लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी अरोरा यांना कंपनीत २५ टक्के भागीदाराचे आमिष दाखविले़ यानंतर नवीन कंपनी टाकण्याच्या नावाखाली अरोरा यांच्याकडून घेतलेली कागदपत्रे कर्जाचे
प्रकरण तयार करून त्यावर सह्णा घेऊन ते महात्मानगरमधील स्टेट बँक आॅफ बिकानेर-जयपूर बँकेत दिले़
न्यायालयाने अरोरा यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संशयित अभिषेक जयस्वाल व कंपनीविरोधात फसवणुकीचा
गुन्हा दाखल करण्याचे आदेश गंगापूर पोलिसांना दिले़ त्यानुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेख़टला दाखल
संशयितांना बँकेने दिलेल्या कर्जाच्या पैशातून नवीन कंपनी न टाकता तसेच बँकेने दिलेले कर्ज व त्यावरील व्याज असे एकूण ५१ कोटी ४६ लाख ८३ हजार ५४ रुपये थकवून अरोरा यांची फसवणूक केली़ या फसवणुकीबाबत अरोरा यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता़