नगरपालिका सभेत ५१ विषयांना मंजुरी

By admin | Published: March 22, 2017 12:46 AM2017-03-22T00:46:53+5:302017-03-22T00:47:12+5:30

येवला : विस्थापितांना गाळे द्या, पथदीप पुर्ववत सुरू करा, गावाच्या तिन्ही मुख्य चौफुलींवर सिग्नल्स बसवावे, भुयारी गटारीचा नव्याने प्रस्ताव पाठविण्यासह ५१ विषयांना सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

51 issues approved in municipal council | नगरपालिका सभेत ५१ विषयांना मंजुरी

नगरपालिका सभेत ५१ विषयांना मंजुरी

Next

येवला : विस्थापितांना गाळे द्या, पथदीप पुर्ववत सुरू करा, गावाच्या तिन्ही मुख्य चौफुलींवर सिग्नल्स बसवावे, भुयारी गटारीचा नव्याने प्रस्ताव पाठविण्यासह ५१ विषयांना येवला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. गुरुवारी नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सुरज पटणी, मुख्याधिकारी राहुल वाघ उपस्थित होते. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी प्रास्ताविकेतून सर्व योजनांची माहिती सभागृहाला दिली. सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले. नवनिर्वाचित सदस्यांनी विविध विषयांबाबत प्रश्न उपस्थित करून माहिती जाणून घेतली. तसेच प्रभागातील विविध समस्या व  नवीन विकासकामे करण्याबाबत सूचना दिल्या.
सर्वप्रथम मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. येवला शहर पाणीपुरवठा योजनेचा व भुयारी गटार योजनेचा आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाने निधी देताना येवला नगरपालिकेला डावलले. राज्य शासनाकडे नगरोत्थान अंतर्गत फेरप्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आाला. दोन वर्षांपासून बंद असलेल्या येवला-कोपरगाव रोडवरील पथदीप टोल कंपनीकडून हस्तांतरित करून पथदीप पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. विंचूर चौफुली, फत्तेबुरुज नाका व गंगादरवाजा नाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल्स बसविणे, तसेच या भागातील पादचारी/ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भुयारीमार्ग तयार करण्याबाबत विचार-विनिमय करण्यात आला. महात्मा फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापन बदलून पालिकेने ताब्यात घेण्याचा निर्णय झाला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत येवला शहराची स्वच्छतेची वाटचाल निश्चित करण्यात आली. चौदाव्या वित्त आयोगाच्या प्राप्त होणाऱ्या निधीतून स्वच्छताविषयक व इतर विकासकामे करणे. पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनिमयन योजना २०१७ अन्वये अंमलबजावणी करणे. नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरुपाने भाड्याने दिलेल्या जागांचे मोजमाप करून त्यानुसार भाडे आकारणी करणे. नागड दरवाज्यालगत बांधलेल्या गाळ्यांना नियमानुसार भाडे आकारणी करणे याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, शेख परवीन बानो निसार, शेख तेहसीन अ. रज्जाक, शेख निसार, मोमीन सबिया अ. सलीम, शेख रईसा बानो शेख उपस्थित होते. (वार्ताहर)



 

Web Title: 51 issues approved in municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.